मी गरीब, त्यामुळे भूक काय असते माहीत आहे ? शिवराजसिंह चौहान

गुर्जर यांनी शिवराजसिह यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे, कीमुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह यांच्याकडे फक्त पाच एकर जमीन होती. आज मात्र त्यांच्यांकडे हजारो एकर जमीन आली कुठून ?
मी गरीब, त्यामुळे भूक काय असते माहीत आहे ? शिवराजसिंह चौहान

भोपाळ : "" हो, मी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे गरीबी, दारिद्य्र आणि भूक काय असते हे मला माहीत आहे. मी गरीब असल्याने मी मामा बनून गरीब पोरापोरीनं शिक्षण देत आहे. मी गरीब असल्याने प्रत्येक गरीब माणसाचे दु:ख मला माहीत असे सांगत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 


राज्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचला असून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोपप्रत्योरोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरूद्ध माजी मुख्यमंत्री कमनलनाथ यांच्यातील सामना रंगला आहे. जर पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले तर पक्ष अधिक मजबूत होणार आहे. जर कॉंग्रेसला जागा मिळाल्या तर भाजपला तारेवरची कसरत करावी लागेल. 

राज्यातील भाजपची मंडळी कोणत्याही परिस्थिती पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सज्ज झाले. राज्यातील कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या समर्थक आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यात पोटनिवडणूक होत आहे. 

प्रचारात एकमेकांचे वाभाडे काढले जात आहे. कॉंग्रेसचे नेते आणि कमलनाथ यांचे विश्वासू सहकारी दिनेश गुर्जर यांनी शिवराजसिंह यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गुर्जर यांनी शिवराजसिह यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे, की आमचे नेते कमलनाथ हे देशातील दोन नंबरचे उद्योजक आहेत. ते काही गरीब कुटुंबातून पुढे आलेले नाहीत. मात्र मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह यांच्याकडे फक्त पाच एकर जमीन होती. आज मात्र त्यांच्यांकडे हजारो एकर जमीन आली कुठून ? त्यांनी शेतकऱ्यांचे रक्त पिले आहे असा घणाघातही केला. 

शिवराज यांना गरीब म्हटल्याने त्यांनी या मुद्याकडे लक्ष वेधत हो, मी गरीब असल्याचे म्हटले आहे.गरीबी, दारिद्य्र आणि भूक काय असते हे मला माहीत आहे. मी गरीब असल्याने मी मामा बनून गरीब पोरापोरीनं शिक्षण देत आहे. मी गरीब असल्याने प्रत्येक गरीब माणसाचे दु:ख मला माहीत असल्याचे सांगत कॉंग्रेसवर टीका केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com