दहा रुपयासाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून पेटविले..  - An illegal liquor dealer tried to burn one person alive by throwing petrol on his body | Politics Marathi News - Sarkarnama

दहा रुपयासाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून पेटविले.. 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

उधारीचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून अवैध दारू विक्रेत्याने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री नऊ वाजता घडली. 

बुलडाणा : जिल्ह्यातील दारूचे उधारीचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून अवैध दारू विक्रेत्याने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री नऊ वाजता घडली. 

मलकापुर तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहेत. ग्राम देवधाबा मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. दारु विक्रेत्यांची ऊधारीचे पैसै वसुल करण्यासाठी जिवंत माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहचली आहे.

देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय ४५) हे गावातील अशोक गणपत  भिसे यांचे घरी दारु पिण्यासाठी गेले. त्यांनी दारु मागितली असता यावेळी भिसे याने मागील ऊधारीचे दहा रुपये दे मग दारु देतो, असे म्हटले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. अशोक भिसे याने घरात जाऊन बिसलरी बाटलीमध्ये पेट्रोल आणले व काशिनाथ राजाराम उगले याच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिस लावून पेटवून दिले. यात उगले गंभीर जळाला.

त्याला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले यांनी ग्रामीण पोलिसांना दिली आहे. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे याच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यास अटक केली आहे. काल त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उगले याची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे करीत आहे.

संबंधित लेख