हिम्मत असेल तर मुख्यमंत्री, राऊतांनी उत्तर द्यावे...किरीट सोमय्या यांचे आव्हान - If you have the courage, Chief Minister, Raut should answer  Kirit Somaiya's challenge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

हिम्मत असेल तर मुख्यमंत्री, राऊतांनी उत्तर द्यावे...किरीट सोमय्या यांचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. 

मुंबई : अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. 

अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारामध्ये तीन हजार कोंटीचा जमीन गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दहीसर, भूखड गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे कागदपत्रे, पुरावे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हिम्मत असेल संजय राऊतांनी यावर बोलावं, असं सोमय्या म्हणाले. संजय राऊत मुळ प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कथित घोट्याळ्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.  'भूखंडाचं श्रीखंड करणारे हे सरकार आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

ठाकरे परिवाराने या परिसरात 40 जमिनीचे तुकडे घेतलं. त्यातील 21 हे जमिन व्यवहार हे अन्वय नाईक परिवाराशी संबधित आहेत. ठाकरे यांच्यावरील पाच आरोपांपैकी एका आरोपाचं तरी उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. माझ्याकडील पुरावे चुकीचे असतील तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असे सोमय्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडे हिम्मत नाही म्हणून ते उत्तर देत नाही. परिवहन मंत्री अनिल परब, महापैार किशोरी पेडणेकर यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी कारवाई करतील, असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात 21 जमीन व्यवहार झाले आहेत," असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषदेत केला. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटूंबियांचे व्यवहार काय आहेत हे जनतेसमोर आले पाहिजे , असे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

नाईक आणि ठाकरे परिवाराचे जमीन खरेदी - विक्रीचे व्यवहार हे जनतेसमोर आले पाहिजे. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर आणि अन्वय नाईक यांनी एकत्र येणे म्हणजे काय, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. ब्लॅकच्या पैशांचे व्हाईट करण्यासाठी ठाकरेंचे जमीन व्यवहार आहेत का, असा प्रश्न जनता विचारत आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. 

ठाकरे यांच्या जमीन-खरेदीचा व्यवहार आहे का अशी विचारणा, राज्यातील सामान्य जनता करीत आहेत. ठाकरे परिवाराने जमिनीमध्ये एवढी गुंतवणूक का व कशासाठी केली. दोन ते तीन व्यवहार झाले असते तर समजू शकतो मात्र इथे 21 व्यवहार झाले आहेत, यांचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी करावा, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. रवींद्र वायकर हे जमिनीचा व्यवसाय करणारे छोटेसे शिवसैनिक आहेत, त्यांचे व्यवहार हे आहेत , असे सोमय्या यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख