अहंकारी सरकारच्या लाठ्याकाठ्या आम्हाला रोखू शकत नाहीत .. ! प्रियंका गांधींचा इशारा - If our raised sticks and the police had protected the Dalit girl ...! | Politics Marathi News - Sarkarnama

अहंकारी सरकारच्या लाठ्याकाठ्या आम्हाला रोखू शकत नाहीत .. ! प्रियंका गांधींचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

पोलिसांनी राहुल गांधीसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली.

हाथरस (यूपी) : एका अहंकारी सरकारच्या काठ्या आम्हाला कदापी रोखू शकत नाहीत, जर ह्याच काठीने, हेच पोलीस दलित मुलीच्या रक्षणासाठी उभे राहिले असते तर चांगले असते असे सांगत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडले. 

हाथरस येथील एका दलित मुलीवर चार ते पाचजणांनी गेल्या 14 सप्टेबररोजी बलात्कार केला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली असून तिच्या अंत्यसंस्कारावरून अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत. आज हाथरसमध्ये जाण्यासाठी निघालेल्या प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडविले. 

पोलिसांनी राहुल गांधीसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत राहुल पडल्याचे चित्रही समोर आहे. पोलिसांनी काही कारण नसताना आमच्यावर लाठीमार केल्याचा आरोपही खुद्द राहुल यांनी केला आहे. या लाठीमाराचा प्रियंका गांधी यांनी निषेध केला आहे. मुळात हा लाठीमार कोणाच्या इशाऱ्यावरून केला असा सवाल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. 

राहुल गांधी हात उचलण्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा इशाराही देण्यात दिला आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी राहुल यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीविरोधात टीका केली आहे. एक अहंकारी सरकारच्या काठ्या आम्हाला रोखू शकत नाही. याच काठ्यांचा उपयोग दलित मुलींच्या संरक्षणासाठी वापरल्या असत्या तर बरे झाले असते असे सांगत योगी सरकारला लक्ष्य केले. 

आपणे राहुलजी को मारा है, देश आप को माफ नही करेंगा ! किसके इशारेपे आपणे लाठीचार्ज किया असा सवाल संतप्त सवाल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हाथरसमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना केला आहे. 

राहुल गांधी यांना तर पोलिसांनी अटकच केली आहे. हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला असतान पोलिसांबरोबर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी पोलिस राहुल यांच्याशी चर्चा करीत होते, तेव्हा कॉंग्रेसचा कार्यकर्ते म्हणाले, की तुम्ही कोणाच्या आदेशावरून राहुल गांधीवर दंडुका उचललात. देश तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. 

हाथरसला मला एकट्याला चालत जायचे आहे. मला जावू द्या! तुम्ही मला एक सांगा की कोणत्या कायद्याखाली अटक करीत आहे.'' असे राहुल गांध यांनी पोलिसांना विचारले त्यावर त्यावर पोलीस म्हणाले, "" आम्ही तुम्हाला कलम188 आपीसी अंतर्गत अटक करीत आहोत. कारण आपण कायद्याचे उल्लंघण करीत आहात. पोलिसांना राहुल हे विनंती करीत होते की मला एकट्याला जावू द्या कारण मला हाथरसमधील पिडित मुलीच्या आईवडीलांची भेट घ्यायची आहे पण, पोलिसांनी त्यांना तेथे जाण्यास परवानगी दिली नाहीत त्यांना अटक करण्यात आली आहे. कोरोना कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारण त्यांना देण्यात आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख