वीज बिल सवलतीची फाईल एका पॅावरफुल मंत्र्यानं दाबली... - If the government cuts power we will connect it assured Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

वीज बिल सवलतीची फाईल एका पॅावरफुल मंत्र्यानं दाबली...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

 महावितरण 50 टक्के तोटा सहन करू शकतो, असा अहवाल देण्यात आला होता, पण ही फाईल राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवली आहे," असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला : "राज्य सरकारने विजेच्या संदर्भातील जो निर्णय घ्यायचा, होता तो घेतला नाही, उलट ज्यांनी बिल भरलं नाही त्यांची वीज कट केली जाईल असं म्हटलं, हे राज्याचं दुर्दैव आहे. महावितरण 50 टक्के तोटा सहन करू शकतो, असा अहवाल देण्यात आला होता, पण ही फाईल राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवली आहे," असा घणाघाती त्या आरोप मंत्र्याचं नाव न घेता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरेंना मी विचारतो मुख्यमंत्री निर्णय घेतात की एखादा मंत्री निर्णय घेतो ? मग महावितरणने सरकारला दिलेली नोट सरकारने मान्य का केली नाही, याचा खुलासा करावा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण कारभार एखादा मंत्री सांभाळतो यावरून असे सिद्ध होत." तो मंत्री पॉवरफुल असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

'वीजबिल 50 टक्के माफीचा निर्णय घेतला नाही तर वीज बिल भरू नका,' असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. याबरोबरच, 'वीज कट केली तर ती आम्ही जोडून देऊ' असं आश्वासन सुद्धा दिलंय. शाळे संदर्भात बोलताना शाळा उघडण्याचा निर्णय पालकांना घेऊ ध्या असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे. वीज बिल माफी संदर्भात राज्यातील उर्जा मंत्र्यांची भूमिका दूटप्पी आहे. हे राज्याचे दूर्दैव असल्याची टिका ही त्यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे विरोधकांच्या अजेंड्यावर चालणारे सरकार आहे. अशी खोचक टिका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने स्वतः काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नाही. विरोधक मागणी करतात मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते. म्हणजेच हे सरकार स्वतःहून चालविले जात नसून ते विरोधकांद्वारे चालविले जात असल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ते व युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, चंद्रशेखर पांडे, राम गव्हाणकर उपस्थित होते.  

हेही वाचा : सरकार आहे कि छळछावणी : आशिष शेलार   
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कमी झाल्याचं चित्र समोर आलं होतं. परंतु पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. दिवाळीनंतर म्हणजे सोमवारी (ता.23) शाळा उघडणार आहेत  भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी टि्वट करून राज्य सरकारला यावरून झोडपले आहे. शाळा सुरू करण्यातही सावळागोंधळ सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला आहे. 

(Edited  by : Mangesh Mahale) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख