पोलिसांच्या बदल्यांवर मी बोलणारच आहे : फडणवीस यांचा इशारा - I will speak on transfers of police officers says devendra fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांच्या बदल्यांवर मी बोलणारच आहे : फडणवीस यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने 45 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या. 

पुणे : राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या बदल्यांबाबत मी योग्य वेळ येताच बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाराजी असून चांगल्या अधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याची तक्रार असल्याचे विचारल्याबद्दल ते म्हणाले की या पोलिसांच्या बदल्यांबद्दल पोलिस महासंचालकांचा अहवाल प्रसिद्ध झाला तर त्यामध्ये कोणाकोणाचा हस्तक्षेप झाला आहे, याची माहिती उघड होईल. ती उघड झाली तर सरकारची अडचण होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल नियमानुसार कार्यवाही होण्याबाबत आग्रही होते, असे बोलले जात होते. त्यावर फडणवीस यांनी बोट ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल्यांवरून बरीच खदखद असल्याची चर्चा होती. त्यातही गृह विभागाकडील बदल्यांकडे अनेकांचे लक्ष होते. यावर आता फडणवीस काय बोलणार, याची उत्सुकता आहे. राज्य सरकारने 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यावरून काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांत वाद असल्याचे सांगण्यात येत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख