अजितदादांच्या नंतर जयंत पाटलांची सुद्धा शिवेंद्रसिंहराजेंशी जवळीक - I will only take bouquets from Shivendra Raje Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांच्या नंतर जयंत पाटलांची सुद्धा शिवेंद्रसिंहराजेंशी जवळीक

ओंकार कदम
शनिवार, 17 जुलै 2021

जयंत पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रराजे यांच्याकडूनच बुके घेणार असे सांगितले.

सातारा : जलसंपदामंत्री जयंत पाटील हे Jayant Patilआज सातारा येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट दिली. या वेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे विद्यमान चेअरमन आज भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendra Raje यांच्या बरोबरच इतर संचालक सुद्धा उपस्थित होते. 

बराच वेळ सर्वांबरोबर विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला तेव्हा जयंत पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रराजे यांच्याकडूनच बुके घेणार असे सांगितले. सातारची जिल्हा बँक ही पक्ष विरहित बँक असल्याची ख्याती सर्वत्र आहे. सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात आहे. 

विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांची सातारची पावसातली सभा मोठ्या प्रमाणात गाजली. त्या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणच बदलून गेली परंतु ती सभा ज्या सातारा शहरात झाली त्या सातारा-जावळी मतदार संघात मात्र भाजपमध्ये असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. त्या वेळीच शिवेंद्रराजे यांच्या राजकीय वजन आणि मतदार संघावर असलेली पकड याचा अंदाज सर्वांना आला होता. अगदी सोसायटीपासून ते विधानसभेच्या तीन मतदार संघावर शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठा प्रभाव आहे. 

जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा रामराजे-शिवेंद्रराजे या दोन नेत्यांची मोठी पकड आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांचे जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सध्या शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आहेत. या आधी ते राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यांबरोबर त्यांचे नाते हे जिव्हाळ्याचे राहिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा विरोधी आमदार असून सुद्धा शिवेंद्रराजे यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आजच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीचा प्रत्यय पाहायला मिळाला.

तरच मनसेसोबत युती शक्य ; चंद्रकांतदादांचे सूतोवाच
 नाशिक : ''मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहेत, पण  जोपर्यंत परप्रांतीय संदर्भात आपला धोरण मनसे बदलत नाही तोपर्यंत युती शक्य नाही," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख