मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप त्या तरुणीने मागे घेतल्यानंतर भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी एक व्हिडीओ रिलीज केला आहे. यात ते म्हणतात, "सत्याचाच विजय होतो...मी रेणू शर्माच्या विरोधात आजही बोलणार नाही..."
कृष्णा हेगडे म्हणतात, "रेणु शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली असल्याचे मला प्रसारमाध्यमातून समजले. यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असेल. महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व सक्षम आहे. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. अशा तक्रारींना रोखले पाहिजे. त्यांच्याविरोधात उभं राहिले पाहिजे. रेणु शर्मा यांच्या विरोधात मी दहा वर्षापूर्वीही काहीही म्हटलं नव्हते, आणि आजही मी त्यांच्याविषयी काहीही विधान करू इच्छित नाही, कारण त्या एक महिला आहेत. मी नेहमीचं म्हणतो, सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते.."
पवार म्हणतात, मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.. https://t.co/kGVNfZLx3m
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 22, 2021
मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे
मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. ही तक्रार त्या महिलेने मागे घेतली आहे. या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे या महिलेने सांगितले. मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठकही घेतली होती. मात्र, भाजप नेते हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीशी बोथट झाली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण त्यानंतर मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत पवार यांनी आपली भूमिका मांडली. हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान आपण केले होते, त्याबाबत आता नवी माहिती प्रश्न निर्माण करणारी आहे. काही तक्रारी लक्षात घेता, यात नक्की काय घडले याचा विचार करायला हवा, असेही पवार म्हणाले होते.
Edited by : Mangesh Mahale

