ये जंग लडना मैं ना छोडूंगी : आत्महत्या केलेल्या तरुणीचा मंत्र्यासोबत फोटो व त्यावरील काॅमेंट - i will not quit fight fb post by girl who committed suicide in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

ये जंग लडना मैं ना छोडूंगी : आत्महत्या केलेल्या तरुणीचा मंत्र्यासोबत फोटो व त्यावरील काॅमेंट

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

संबंधित मंत्री त्या तरुणीला ओळखत असल्याचे फेसबुक पोस्टवरून दिसून येत आहे. 

पुणे : पुण्यात आत्महत्या केलेल्या एका तरुणीच्या आत्महत्येवरून राजकीय वादळ महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. या आत्महत्येशी विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्याचे आडवळणाने नाव घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने निशाणा साधला आहे.

या तरुणीच्या पालकांनी मात्र कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. मात्र या तरुणीचे फेसबुक प्रोफाईल पाहिल्यानंतर संबंधित मंत्री आणि ती तरुणी हे एकमेकांना चांगले ओळखत असावेत, असे दिसून येते. तसेच या तरुणीने वेगवेगळ्या वेळी टाकलेल्या पोस्टही संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. 2018 च्या सुरवातीला हा मंत्री आणि संबंधित तरुणीचा परिचय झाल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील वास्तव्यास असेलल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना महमदवाडी येथे उघडकीस आली. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली. 
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ महिन्यापूर्वी ही तरुणी पुण्यात स्पोकन इंग्लीशच्या क्लासेसाठी आली होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. आई-विडीलांचा जबाब घेतला असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाउल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही.

या प्रकारानंतर आजपासून भाजपने या आत्महत्येच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. या तरुणीच्या सोशल मिडियातील विशेषतः फेसबुकवरील पोस्ट पाहिल्यानंतर अनेक बाबी समोर येतात.

ही बातमी वाचा : मंत्र्याच्या गर्लफ्रेंडची आत्महत्या : अतुल भातखळकर म्हणतात

डिसेंबर 2018 मध्ये टाकलेल्या पोस्टमध्ये ही तरुणी म्हणते ``मी माझे काम नाही सोडणार. पण मी कोणाची कार्यकर्ती नाही. ना कोणत्या पक्षात आहे. माझे कोणासोबतही भांडण झालेले नाही. फक्त पक्ष किंवा कोणत्या व्यक्तीसोबत मला माझ नाव जोडून नाही घ्यायच.``

त्यानंतर काही दिवसांत संबंधित मंत्र्यासोबतचा वेगळा फोटो फेसबुकवर शेअर केलेला आहे. दोघेच त्या फोटोत बसलेले दिसत आहेत. या फोटोवरील कॅप्शन मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे.

जो हूआ सो हूआ, ये जंग लडना मैं ना छोडूंगी...
घायल शेरनी हूॅ, दूगनी ताकत के साथ लौटूंगी

असा शेर या तरुणीने कॅप्शन म्हणून टाकलेला आहे. त्यामुळे त्याचा नक्की अर्थ काय, हे कोडेच आहे.

त्या मंत्र्याला निवेदन देतानाही फोटो फेसबुकवर दिसून येत आहे. हा मंत्री आपल्या समाजाचे भूषण आहे, असे मत व्यक्त करत अनेक विशेषणे त्या मंत्र्याला लावली आहेत. त्या खाली एक महत्वाची टीप म्हणून ओळ टाकलेली आहे. संबंधित मंत्री आणि त्या तरुणीच्या भेटीवरून कोणताही अर्थ काढू नये, असे त्यात म्हटले आहे. (टिप- काही कामानिमित्त भेट - जास्त बुद्धीचालकाने वेगळा अर्थ काढू नये, असे हे नेमके वाक्य आहे.)

ही बातमी वाचा : पंकजा मुंडे म्हणातात  तिच्या मृत्यूची चौकशी करा

 

ही तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आहे. विदर्भातील हा मंत्री संबंधित तरुणीच्या घरीही गेला होता. तो मंत्री आणि तिच्या घरातील इतर व्यक्तींसोबतचा फोटोही फेसबुकवर आहे. त्यावरील फोटो ओळ वेगळी आहे. `भीड में सभी लोग अच्छे नही होते और अच्छे लोगों की भीड नही होती,`असे त्या फोटोवर म्हटले आहे. 

2019 या वर्षाच्या अखेरीस एक पोस्ट संबंधित तरुणीने लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की 

``आज या वर्षाचा शेवट होतोय. या वर्षाच्या शेवटी माझ्या  आयुष्यात बर्‍याच वाईट व बर्‍याच चांगल्या गोष्टी घडल्या. पण प्रत्येक वेळी मला अनुभव मिळाला. या वर्षी मला भरपूर निःस्वार्थ प्रेम पाठबळ मिळत आहे नेहमी मिळत रहावे.धन्यवाद सर्वांचे. मी आपल्याला शब्द देते मी कोणाच्याही विश्वासाला तडा न जाऊ देता होईल तेवढी साथ देईल. सर्वाच्या होईल तेवढी कामी येईल. या वर्षी संघर्षातून मला माझ्याअडचणीतून मार्ग काढता आला आणि मला आनंद आहे मला कुठेतरी स्वतः ला सिद्ध करता आले. आईवडीलांच्या मी कामी आले. बरेच चांगलेवाईट अनुभव आले. काही लोक लांबली. त्याहुन चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली आणि मला प्रत्येक वेळी सावली सारखी साथ देणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना धन्यवाद, मी आपली नेहमी आभारी असेन. कधी चुकून कोणाच्या भावना माझ्याकडुन दुखावल्या गेल्या असतील मी  क्षमस्व आहे.  मोठ्या मनाने मला माफ करा, असे या तरुणीने म्हटले आहे. माझे कधी कोणासोबत भांडण झाले असेल त्यात चूक कोणाचीही असू द्या. मी माफी मागते. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू, ही अपेक्षा व्यक्त करते.``

या तरुणीने 2020 आणि 2021 मध्ये मात्र या मंत्र्यासोबत एकही फोटो शेअर केलेला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख