मी भाजप सोडणार नाही : खासदार रक्षा खडसे 

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक​ आहे.
I will not leave BJP: MP Raksha Khadse
I will not leave BJP: MP Raksha Khadse

नवी दिल्ली : "आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. मी भाजपची खासदार म्हणून निवडून आले आहे, त्यामुळे मी भाजपतच काम करत राहणार आहे,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंच्या राजीनाम्यावर दिली. 

एकनाथ खडसे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. 

नाथाभाऊंच्या या बहुचर्चित राजीनाम्यानंतर रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुखदायक आहे. नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे. 

पक्ष सोडण्याच्या बाबत रक्षा खडसे म्हणाल्या की मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे, असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. 

भाजपने त्यांना भरपूर काही दिले आहे, हे त्यांनीसुद्धा नमूद केले आहे. सर्वजण पक्षामुळेच मोठे होत असतात. पण नाथाभाऊंचेही योगदान पक्षवाढीसाठी होते, हे नाकारता येत नाही. त्यांनी 40 वर्षे पक्षासाठी दिली आहेत. त्यांच्यामुळे राज्यात पक्ष मोठा झाला, हे मान्यच करावे लागेल. 

मी सांगितले तसेच झाले पाहिजे, असा आग्रह नाथाभाऊंचा कधी नव्हता. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मीही राजीनामा दिला पाहिजे, असे काही नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

आपण भाजपमध्ये कधीपर्यंत राहणार, या प्रश्‍नावर रक्षा खडसे म्हणाल्या की, याचे भाकित कुणीही करू शकत नाही. ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, त्यासाठी आपल्याला काम करत राहावे लागते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com