हे तर डाकूंचे सरकार ; मिलिंद नार्वेकरांचा बंगला मी जमीनदोस्त करणार

खासदार भावना गवळी यांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला जात आहे.
हे तर डाकूंचे सरकार ; मिलिंद नार्वेकरांचा बंगला मी जमीनदोस्त करणार
1Sarkarnama_20_283_29_2.jpg

अकोला :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या चार शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर आणणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोला येथे आज केले. ते वाशीम येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी ठाकरे सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडलं. 

खासदार भावना गवळी यांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांचे सचिव मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर बंगला बांधला असून लवकरच हा बंगला मी जमीनदोस्त करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितलंय. दरम्यान त्यांना जन आशीर्वाद यात्रेवरून विचारलेल्या प्रश्नावर 'हे सरकार डाकूंचे सरकार आहे.' असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'हम करेसो कायदा' असं हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर, अनिल परब, भावना गवळी, यशवंत जाधव या चैाघांवर आता ईडी, पोलिस कारवाई करणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

समुद्रकिनारी नियमांचे उल्लंघन करुन उभारलेला नार्वेकरांचा हा बंगला पाडल्याचा दावा नार्वेकरांनी केला होता. प्रत्यक्षात हा बंगला जागेवरच उभा आहे, असा दावा सोमय्यांनी केला. नार्वेकर हे काय महाराष्ट्राचे जावई आहेत का, असा सवालही त्यांनी नुकताच केला आहे.  सोमय्या म्हणाले की, मंत्रालयातील संबधित अधिकाऱ्यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडण्याचे आदेश दिले. पण नार्वेकरांनी माहिती दिली की त्यांनी तो बंगला पाडला. प्रत्यक्ष पाहिले तर हा बंगला उभा आहे. नार्वेकर हे महाराष्ट्राचा जावई आहेत का? या बंगल्यावर कारवाई होत नाही. शिवसेना म्हणजे खंडणी सेना, ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार आहे. हा माफिया कंत्राटदारांचा अड्डा आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट
पारनेर : पारनेरच्या तहशीलदार ज्योती देवरे यांच्या एका आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. 
 Edited by : Mangesh Mahale


पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट
पारनेर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in