मी पुन्हा येणार.. पुन्हा येणार, ही घोषणा जनतेला आवडली नसावी : खडसेंचा शोध - i will come back slogan by fadnavis may not liked people says khadase | Politics Marathi News - Sarkarnama

मी पुन्हा येणार.. पुन्हा येणार, ही घोषणा जनतेला आवडली नसावी : खडसेंचा शोध

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

खडसेंची खदखद कमी होईना 

जळगाव : भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

एकनाथराव खडसे यांनी काल पत्रकारांशी बोलतांना खडसे सांगितले, कि गेली चाळीस वर्षे आपण पक्ष वाढविण्यासाठी कार्य केले आहे. आजपर्यंत आपण पक्षावर कधीही टिका केली नाही. मात्र पक्षामध्ये अशा काही प्रवृत्ती आल्या कि त्यांना पक्षात आपला प्रतिस्पर्धी नको असे वाटू लागले. केवळ त्याच कारणामुळे त्यांनी राज्यात पक्षाचे असलेले सरकारही घालविले.

मला चांगले आठवतेय राज्यात मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी माझ्या साथील गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी,भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट,सुधीर मुनगंटीवार असे सहकारी होते. आम्ही सर्वांनी मिळून एक रान उठविल, वादळ निर्माण केले. आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर १२३ आमदार निवडून आणले आणि आज देशात व राज्यात भाजपची सत्ता होती व सर्व साधनसंपत्ती होती, विशेष म्हणजे शिवसेनेशी युती होती तरी १०५ आमदार निवडून आले, याची कारणे काय आहेत. मी पुन्हा येणार..मी पुन्हा येणार अशी घोषणा केली तीच महारष्ट्राच्या जनतेला आवडली नाही काय, कि कोणते कारणे आहेत याचा मी शोध घेणार आहे.

सध्याचे सरकार पडणार नाही
राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत बोलतांना खडसे म्हणाले, सद्याच्या कालखंडात राज्यातील सरकारमध्ये वर्षे दीड वर्षे तरी उलथापालथ होण्याची कोणतीही शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष असो किंवा अन्य पक्ष असो कितीही प्रयत्न केले तरी हे शक्य नाही. कारण आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाकडे १०५ आमदार आहेत. भाजपला सत्ता मिळविण्यासाठी तब्बल चाळीस आमदारांची गरज आहे. आणि त्यासाठी कोणता तरी पक्ष फोडावा लागणार आहे. कॉंग्रेसचे ४५ आहेत त्यांचे ४० निघणार नाहीत. राष्ट्रावादी कॉंग्रेसचे ५४ आहेत त्यांचेही चाळीस निघणार नाहीत. मग चाळीस आमदार आणायचे कुठून?आजच राजकीय समिकरण अस आहे कि कुठला तरी पक्ष भाजपमध्ये सामिल झाल्याशिवाय आमची सत्ता येणार नाही. तसेच कुणीतरी पाठींबा काढल्याशिवाय हे सरकार पडणार नाही. त्यामुळे भानगडी होतील, एकमेकामध्ये दुरावा होईल. एकमेकांना शिव्याही घालतील परंतु हे सरकार टिकविण्याचा ते प्रयत्न करतील असे मला वाटते. त्यामुळे ही केवळ भाबडी आशा आहे हे सरकार कोसळेल आम्ही राज्यात सरकारमध्ये येवू, आमच्याकडे आमदार येतील. गेल्या चाळीस वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतो हे सरकार वर्षे- दिड वर्षे तरी पडत नाही.

कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही
पक्ष सोडण्याबाबत ते म्हणाले कि, मला पक्षात येण्याबाबत सर्व पक्ष बोलावित आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र आजपर्यत आपण भारतीय जनता पक्ष सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख