`शिवसैनिकाला पंतप्रधान पदावर विराजमान करायचंय!`

शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी एकही नगरसेवक नव्हता. त्यावेळी नारळ फोडला त्याच पाण्याचे थेंब माझ्या अंगावर उडाले, त्यात मी ओला चिंब झालो आहे, हे शिवसैनिकामुळेच- उद्धव ठाकरे
udhhav thackray
udhhav thackray

मुंबई : "हिमालयावर संकट आल्यास महाराष्ट्राचा सह्याद्री धावतो. चीनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. सुरुवातीला आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,'' असे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने म्हणाले. भविष्यात शिवसैनिकाला देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

"मला काही जण म्हणतात की, तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, आमची संस्कृती आहे. "प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेना प्रमुखसुद्धा लाचार होणार नाही,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी एकही नगरसेवक नव्हता. त्यावेळी नारळ फोडला त्याच पाण्याचे थेंब माझ्या अंगावर उडाले, त्यात मी ओला चिंब झालो आहे, हे शिवसैनिकामुळेच. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला आणि आपल्याकडे मुख्यमंत्रिपदही आले. शिवनेरीच्या मातीची ही कमाल असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केले की, अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला.

उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत : संजय राऊत
उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com