अजितदादांचे दुखणे काय आहे, हे मला माहितीय... - I know what Ajit Pawar's pain is says Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचे दुखणे काय आहे, हे मला माहितीय...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

अजित पवारांवर टीका करण्याचे टाळले

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शक्यतो बोलत नाही. अजित पवारही फडणविसांवर टीका करण्याचे टाळतात. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर अजितदादांनी भाजपवर टीका केली. 105 आमदार टिकविण्यासाठी सरकार पडणार हे भाजपला सांगावे लागते, अशी टीका अजितदादांनी केली होती.

या टिकेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारले असता त्यांनीही प्रतिटिका करण्याचे पुण्यात टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुखणे काय आहे ? हे मला माहीत त्यावर योग्यवेळी बोलेन, असे म्हणून त्यांनी तो विषय टाळला. फडणवीस आणि अजितदादा यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वर्षपूर्तीनिमित्त हे दोघेही चर्चेत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनीही अजितदादांना सावरून घेतले.  

पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की आम्ही कोणाच्या बोलण्याने महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. पण शिवसेना म्हणजे, मराठी माणूस आणि महाराष्ट्र आहे, असे नसल्याचे सांगत त्यांनी शरसंघान साधले. "लव्ह जिहाद'च्या मुद्यावर शिवसेना आग्रही होती. मात्र, त्यांच्या भूमिकेत आता बदला झाला आहे, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला. 

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील भाजप-मित्रपक्षांचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ फडणवीस पुण्यात आले होते. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजकीय परिस्थिती, त्याचे परिणाम, राज्य सरकारचे धोरणे आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आपली भूमिका मांडली. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. 

अभिनेत्री कंगना राणावत, पत्रकार अर्णब गोस्वामीबाबतची भाजपची भूमिका महाराष्ट्रद्रोही असल्याच्या आरोपाचे फडणवीस यांनी खंडन केले आणि शिवसेनेच्या धोरणांवरच बोट ठेवले. 
फडणवीस म्हणाले, "राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. विजबिलाबाबतही सरकारने घूमजाव केले असून, अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई नाही. पंचनामेही अर्धवट केली. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेतले नाही. कोरोनाकाळात भ्रष्टाचार होत आहे. त्यावर विरोधक म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत. ' 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीचा केल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आरोप फडणवीस यांनी खोडून काढले. "बोगद मतदान नोंदल्याचा आरोप म्हणजे, जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे, असे टोलाही फडणवीस यांनी लगावला. या निवडणुकीत "ईव्हीएम' नसल्याने तो आरोप करता येणार नाही म्हणून पाटील आता "कव्हर फायरिंग' करीत आहेत. पाटील यांचा हा आरोप म्हणजे मतदारांवरील अविश्‍वास आहे, असेही ते म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख