जबाबदार मंत्री असलेल्या भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती : संभाजीराजे

संसदेत केलेल्या भाषणाचा अर्धवट संदर्भ दिल्याचा संभाजीराजेंचा दावा
sambhajiraje 1.jpg
sambhajiraje 1.jpg

पुणे : कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मेसेज वाचून मंत्री छगन भुजबळांनी मी संसदेत केलेल्या भाषणावर भाष्य केल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे दिसून येते. यातून महाराष्ट्राची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचा धोका संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

सोशल मिडियावरील पोस्टमध्ये ते म्हणातात की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या घटनादुरुस्ती बिलावर मी ते भाषण केले होते. ज्यामध्ये मराठा समाजावर कश्याप्रकारे अन्याय झाला? हे मी सिद्ध केल होतं. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता. 1967 पर्यंत मराठा समाजाचा ओबीसी(इंटर मीडियेट क्लास) च्या राष्ट्रीय यादी (central list) मध्ये समावेश होता आणि अचानक 1968 मध्ये अचानक मराठा जातीला वगळण्यात आले. 1967 मध्ये एका जी. आर. च्या अनुषंगाने मराठा, माळी आणि तेली या जातींना वगळले होते. त्यानंतर 1968 मध्ये फक्त मराठा समाजाला बाहेर ठेऊन माळी आणि तेली जातींना आत घेतलं गेलं. मी कुणाही जातीच्या विरोधात नाही पण शाहू महाराजांची आरक्षणाची मूळ भावना काय होती? हेच मी बोललो.

एका जबाबदार मंत्री महोदयांकडून मला ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझ्या भाषणातील केवळ एक दोन शब्द सुटे काढून, तेही दुसऱ्याने पाठवलेले वाचून मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेब, आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात, तुमच्या जेष्ठत्वाचा आम्ही आदर करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका, असे आवाहन राजेंनी केले आहे.

मी जे उदाहरण दिले, जे शब्द वापरले ते, गंगाराम कांबळे यांना राजर्षीं शाहू छत्रपती महाराजांनी हॉटेल काढून दिल्याच्या संदर्भातील होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राजर्षींनी जे केलं, ते देशाला कळावं म्हणून उदाहरण दिलं. आजही देशातील राजकारण्यांनी त्या प्रसंगातून आदर्श घेतला पाहिजे हा माझा शुद्ध हेतू होता. मी शिव- शाहूंचा वारस आहे. मी कधीही जातीवाद करत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊन जातीवाद कमी करण्याचाच प्रयत्न करत आहे. ज्याला आपल्यासारख्या जेष्ठ राजकारण्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असेही उत्तर संभाजीराजेंनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com