आमदारकीची मला गरज नाही...

समाज निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे पद स्विकारणे योग्य नाही. धन्यवाद. " असे म्हणत डॉ भारत पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागितलेल्या विधानपरिषद जागेबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
1bhatat_20patankar_0.
1bhatat_20patankar_0.

पुणे : "मी अशा पदांच्या खूपच पलीकडे गेलेला माणूस आहे. मानव मुक्तीचा ; जातीय, वर्गीय आणि स्त्रियांचे शोषण संपलेला, समृद्ध, पर्यावरण संतुलित समाज निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे पद स्विकारणे योग्य नाही. धन्यवाद. " असे म्हणत डॉ भारत पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागितलेल्या विधानपरिषद जागेबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे अनेकांनी फिल्डिंग लावली असताना श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी मात्र 'मी या पदाच्या पलीकडे गेलो आहे," असे म्हटले आहे. डॉ. पाटणकर यांच्या समर्थकांनी 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे,' अशी मागणी केली होती. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर डॉ. भारत पाटणकर यांनी, "या उपाधींची मला गरज नाही,मला अजून शोषित लोकांच्यासाठी काम करायचे आहे," असे सांगितले.

धरणग्रस्त आणि पाणी चळवळीत डॉ. भारत पाटणकर यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी मुंबई येथून वैद्यकीय पदवी संपादन केली. मात्र, दवाखाना न उभारता स्वतःला कष्टकरी लोकांच्या चळवळीत झोकून दिले. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. महाराष्ट्रभर त्यांनी आपले कार्यकर्ते जोडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत साथ दिली आहे. डॉ. पाटणकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पुरोगामी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टिका केली होती, मात्र, त्या टिकेला न जुमानता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ नये, हीच त्यांची भूमिका राहिली आहे.

1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांनी त्यांच्याकडून काहीही मागितले नाही. केवळ वैचारिक बांधिलकी म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्यांचे निकटवर्तीय मोहनराव यादव यांनी शरद पवार यांच्याकडे 'डॉ. भारत पाटणकर यांना आमदार करा," अशी मागणी केली मात्र, पाटणकर यांनी, "मी अशा पदांच्या खूपच पलिकडे गेलेला माणूस आहे. मानव मुक्तीचा; जातीय, वर्गीय आणि स्त्रियांचे शोषण संपलेला' समृद्ध,पर्यावरण संतुलित समाज निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे पद स्विकारणे योग्य नाही," असे म्हटले आहे.


हेही वाचा: पृथ्वीराज चव्हाणांचं कसं... सगळं नियम म्हणेल तसं!


पुणे : कोरोना विषाणूच्या काळात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना प्रवेश परवाना मिळविताना सामान्य माणसाला होणारा त्रास बघता "हेच कडक निकष नेतेमंडळीना असतात का' असा प्रश्न लोकांना पडतोय. अनेकदा पोलिसांशी हुज्जत घालतानाही हाच प्रश्न उपस्थित होत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मात्र सरकारने दिलेले नियम पाळत प्रवास करत आहेत. ता. 23 जून रोजी सातारा ते मुंबई दरम्यानचा त्यांनी केलेल्या प्रवासाचा तपशील "सरकारनामा'ने मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 23 जून रोजी मुंबईला जायचे होते. त्यांची मंत्रालयात एक मीटिंग होती. या वेळी सातारा ते मुंबई या प्रवासासाठी लागणारा परवाना मिळविला. एम एच 11, बी व्ही 0999 या वाहनाचा परवाना त्यानी मिळविला आहे. जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करताना सोबत मेडिकल प्रमाणपत्र जोडावे लागते. परवाना मिळविण्यासाठी लागणारे सगळे सोपस्कार त्यांनी पूर्ण केले. जेव्हा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्हाच्या बाहेर गेले, तेव्हा तेव्हा त्यांनी परवाना पास काढला आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या वेळी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांची नावे त्यांनी नमूद केली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com