`कोल्हापूरात निवडणूक लढविण्यास आजही तयार... विजयी झालो नाही तर हिमालयात जाईल` - i am ready to contest from Kolhapur now if not win will go to himalaya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

`कोल्हापूरात निवडणूक लढविण्यास आजही तयार... विजयी झालो नाही तर हिमालयात जाईल`

उमेश घोंगडे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोथरूडमध्ये निवडणूक लढविण्याचा सांगितला अनुभव 

पुणे : काम करीत राहा,  हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात लढण्यासाठी आलो. माझे आजही आव्हान कायम आहे. मी कोल्हापुरात निवडणूक लढवायला आताही तयार आहे. निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, अशा शब्दांत त्यांनी टिकाकारांना आणि विशेषतः हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले. 

कोथरूडमधील आमदारकीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

त्यांनी कोथरूड विधानसभेची उमेदवारी कशी मिळाली, याचाही प्रसंग या वेळी सांगितला. अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्याचा प्रसंग सांगितला. अमित शहा यांच्या आग्रहामुळे मला विधानसभा निवडणूक लढवावी लागली. मला तेव्हा वाटले होते की ते मला कोल्हापुरातून ते मला संधी देतील. पण त्यांनी कोथररूडमध्ये लढविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे मी येथे आलो. पण तेव्हा अनेकांनी टीका केली. मी कोल्हापुरातून पळून आलो. जातीचा विषय काढला. पण माझे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आजही सांगणे आहे. मी कोल्हापूरमधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले.

मी कोल्हापुरात नसल्याने चुकीचा संदेश जाईल, असे मी अमित शहा यांनी सांगत होते. पण त्यांचा आदेश जुमानणे शक्य नव्हते. मनसेच्या उमेदवाराला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला.  महाविकास आघाडी ही कोथरूडमध्ये त्या निवडणुकीतच स्थापन झाली होती. कोथरूडचा मतदारसंघ अवघड करून ठेवला. मला एका जागेवर खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले. एकास एक अशी लढत झाली.  लोकसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मताधिक्य भाजपला येथे मिळाले असताना विधानसभा निवडणुकीत ते मताधिक्य कमी झाले. पण अनेकांनी रात्रीच्या बैठका घेऊन मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मतमोजणी सुरू असतानाच मी पराभूत होईल, असे अनेकांनी सांगितले. तरी मी निवडणूक जिंकलो, असा अनुभव त्यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख