शिवसेना आमदार म्हणतात, "भाजपने माझ्या अटकेचा खेळ रचला.." - I am firm on my statement Pratap Saranaik | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना आमदार म्हणतात, "भाजपने माझ्या अटकेचा खेळ रचला.."

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.

मुंबई :  मुंबईविषयी वाईट बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला आमदार प्रताप सरनाईक यांनी चांगलचं फटकारलं आहे. याबाबत आमदार सरनाईक यांनी टि्वट केलं  आहे. यात ते म्हणतात की कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सैाम्य शब्दात समज दिली आहे. कंगना जर मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.

प्रताप सरनाईक म्हणतात, "मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही. भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे." 
 
हेही वाचा : शिवसेना इतकी का वैतागली..? संदीप देशपांडेंचा सवाल  

मुंबई : "पाच पैशाची किंमत नसलेल्या कंगणा राणावतच्या वक्तव्यावर शिवसेना इतकी का वैतागली? महाराष्ट्रात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर अजून सरकार गप्प आहे ?" अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबतचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे.

मंदिरात नागरिकांना बंदी, लाखो तरून बेरोजगार आहे. कोरानामुळे लाखो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री घरात बसून काम करीत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवासाविना लोकांचे हाल होत आहे.या सर्व गोष्टीवरून लक्ष हटविण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशाची किमंत नाही, अशा व्यक्तीला शिवसेना किमंत देत आहे. अन्य महत्वाच्या मुद्दावरून जनतेचं लक्ष हटविण्याचं हे षडयंत्र तर नाही ना, याचा विचार जनतेनं केला पाहिजे, असे देशपांडे यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधार्थ काल मुंबईत अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. मागाठाणे येथे महिला शिवसैनिकांनी तिच्या फोटोला काळे फासले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख