मी शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणात मला कोणी गॉडफादर नाही : गुप्तेश्‍वर पांडे  - I am a farmer's porga, I have no godfather in politics: Gupteswar Pandey | Politics Marathi News - Sarkarnama

मी शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणात मला कोणी गॉडफादर नाही : गुप्तेश्‍वर पांडे 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

बिहार विधानभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी पांडे यांनी बिहार डीजीपी पदाचा राजीनामा दिला आहे

पाटणा : मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. राजकारणात मला कोणी गॉडफादर नाहीत. मी शेती करीत होतो, नांगर चालवत होतो. गाईम्हशी चारत होतो तेथून उठून मी आलो आहे. हा तर संघर्षाचा भाग होता आणि हो, मी संघर्षाला घाबरत नाही असे बिहारचे निवृत्त डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला आहे. 

बिहार विधानभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी पांडे यांनी बिहार डीजीपी पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी असाच राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतली होती मात्र, यश न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले होते. आता पुन्हा ते राजकारणात नशीब अजमावणार असल्याची चर्चा आहे. पांडे नितीशकुमार यांच्या जेडीयूकडून की भाजपकडून निवडणूक लढवितात याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राजनीमा दिल्यापासून त्यांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे. 

आजही त्यांनी एक व्हिडिओ ट्‌विट करून आपण कोठे होते आणि कोठून आलो आहोत याची माहिती दिली आहे. पांडे यांनी म्हटले आहे, की मला कोणीही गॉडफादर नाही तसेच माझी पार्श्‍वभूमीही राजकीय नाही. माझ्या घरात ना कोणी बॅरिस्टरही नव्हते. मी शेतात घाम गाळला आहे. नांगर धरला आहे. गाई म्हैशी हिंडविल्या आहेत. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तेथून मी आलो आहे. त्यामुळे संघर्ष काय असतो हे मला माहित आहे. संघर्ष मला नवा नाही. 

आगामी निवडणुकीविषयी बोलताना पांडे म्हणाले, की राज्यातील अनेक लोक येऊन भेट आहेत. राजकारणात उतरण्यासाठी शुभेच्छा देत आहे. आमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवा असे सांगत आहेत. मी याचा निर्णय लोकांमध्ये जावूनच घेणार आहे. जर लोकांना वाटत असेल की मी राजकारणात यावे तर त्याबाबत मी निश्‍चितपणे विचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये या प्रकरणाचे अधिक प्रतिक्रिया उमल्या होत्या. सुशांतप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी विनंती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्राकडे केली होती.त्यानुसार केंद्राने हिरवा कंदीलही दिला. सध्या तशी चौकशी सुरू आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि गुप्तेश्‍वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवरही टीका केली होती. 

तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली पाहिजे अशी भूमिकाही ते सातत्याने घेत आले होते. बिहारचे अधिकारी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन केल्यानंतर तर पांडे यांनी मुंबई पोलीसाविषयी थयथयाट केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पांडे यांच्यामध्ये अजूनही सामना सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख