सलून व्यावसायिकांचे अजून किती बळी घेणार....

सलून व्यावसायिकांच्या अडचणी आणि मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही, तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारानाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.
3Salon_F (1).j
3Salon_F (1).j

पुणे : सलून व्यावसायिकांच्या आत्महत्या वाढत आहे. आत्तापर्यंत दहा सलून व्यावसायिकांचा बळी गेला आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे. सलून व्यावसायिकांच्या अडचणी आणि मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही, तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिला आहे. आणखी किती बळी घेणार, असा सवाल सोमनाथ काशिद यांनी राज्य सरकारला विचारला आहे

येत्या दहा तारखेपर्यंत शिष्टमंडळासोबत चर्चा करून सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत दिली नाही, तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे काशिद यांनी सांगितले. संघटनेतर्फे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या पुतळ्याला निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा अधिकारी यांचा आदेश सलून व्यावसायिकांपर्यंत न पोचवल्याने सलून व्यावसाय कोणत्या अटी व शर्तींवर सुरू करायचे, अशा सलून व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे राज्यात सलून दुकाने सुरू झाली नाहीत

 50 ते 60 टक्के दुकानांचे भाडे थकलेले आहेत. त्यात काही ठिकाणी तर मालक लोकांनी कुलूप लावून ठेवल्यामुळे समाज बांधव दुकाने उघडू शकले नाहीत 20 ते 30 टक्के सलून व्यावसायिक सरकारचे नियम व अटी शर्तीचे पालन करण्यासाठी जो खर्च येणार आहे. तो करू शकलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. 

https://youtu.be/wQgIRfQa3Q8

आज जे सलून चालू केले आहेत. जे आपण सकाळपासून न्यूज चॅनलवर पाहतो ते प्रिमियम कंपनीचे सलून आहेत ज्यांनी सलून सुरू केले आहेत. ते खर्च करू शकतात, पण आपला समाज बांधव खर्च करू शकत नाहीत

सलून व पार्लर असोसिएशनच्या मागण्या

  1. फक्त केसच कापायचे बाकी सेवा देता येणार नाही हा सरकारचा निर्णय सलून व्यावसायिकांना पटलेला नाही.
  2. या निर्णयातून घर खर्च भागवणे,दुकान भाडे, घर भाडे असेल तर कर्जाचे हप्ते संरक्षणासाठी लागणारा खर्च हा सर्व ताळमेळ बसणार नाही
  3. सलून सुरू करताना सरकारने सलून व्यावसायास 50 लाखाचा विमा जाहीर करा.
  4. सलून व्यावसायिकांना 1 लाख रुपयांची त्वरीत अर्थिक मदत करावी.
  5. ज्या सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केली आहे अशा महाराष्ट्रातील दहा आत्महत्या ग्रस्तांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अर्थिक मदत जाहीर करावी.
  6. सलून व्यावसायिकांचे गेल्या चार महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफी सरकारने माफ करावे
  7. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पाहता एखाद्या सलून व्यावसायिकाला कोरोना संसर्ग झाला तर त्याचा दवाखान्याच्या खर्च सरकारने करावा.
  8. मुख्यमंत्री साहेबांनी आमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सलून व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा.

केशकला बोर्ड कार्यान्वित करून अध्यक्ष निवड करावी व अर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा,  मागण्या जो पर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत सलून व्यावसायिकांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.  
सोमनाथ काशिद, अध्यक्ष महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशन 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com