पुणे : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यात काल रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्तगू झालं, सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली, रात्री विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि संजय काकडे यांच्यात डिनर चर्चा झाली असल्याचे समजते.
या भेटीबाबात माजी खासदार संजय काकडे म्हणाले की नाना पटोले माझे जुने मित्र आहेत. मी त्यांना जेवणासाठी बोलवलं होत. तेव्हा ते आले होते. मात्र, पुण्यात काँगेसला चेहरा नाही, महापालिका निवडणूका एकवर्षावर आल्या आहेत. त्यावर ही पटोले यानी काकडे यांच्या बरोबर चर्चा केली असल्याच शक्यता आहे. "महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे माझे जुने मित्र असल्याने आले यात कोणतं ही राजकिय चर्चा झाली नाही," असे संजय काकडे यांनी सांगितले.
पुणे पदवीधरचा संग्राम दोन मराठ्यांतच ? दोन्ही पक्षांचे उमेदवार आज जाहीर होणार.. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
— Sarkarnama (@MySarkarnama) November 9, 2020
हेही वाचा : काही आमदारांचा विरोध, पण हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल
भंडारा : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत येत्या डिसेंबर महिन्यात नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन घेऊ नये आणि अधिवेशनावर होणारा खर्च कोरोनाच्या उपाययोजनांवर आणि विदर्भाच्या विकासावर खर्च करावा, अशी मागणी काही आमदार आणि जनतेतूनही होत आहे. पण पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे ७ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, अधिवेशन कुठे, केव्हा आणि किती दिवसांचे घ्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी विधिमंडळाच्या अधिकारात असतो.कोरोनाच्या काळात पावसाळी अधिवेशन घेण्याचा मुद्दा जेव्हा समोर आला, तेव्हा ते दोन दिवसांचे घ्यायचे, असे सर्वानुमते ठरवण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची स्थिती सध्यापेक्षा भयावह होती. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होतेय आणि मृत्यूदरही कमी कमी होत चालला आहे. ही सुखावह बाब आहे आणि हिवाळी अधिवेशनाला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे त्यावेळी परिस्थिती कशी राहील, ते बघून तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आज हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. दरवर्षी अधिवेशन होते, तसे ते यावर्षीदेखील होईल. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर नागपुरात एक अधिवेशन घ्यायचे, असा करार झालेला आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना कराराचासुद्धा विचार केला जाईल. सरकार किती बिल आणते, त्यावर अधिवेशन किती दिवस चालवायचे, याचा निर्णय होईल. त्यामुळे आजच त्याबद्दल भाष्य करणे योग्य होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

