या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज; पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना

या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज; पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना
Home Minister Dilip Walse Patil's instructions to the police to be alart .jpg

मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) इशाऱ्यानंतर कोंकण विभागात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर व काही प्रमाणात विदर्भातील जिल्ह्यांमधील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस (Police) प्रशासनाने सतर्क व दक्ष राहण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. (Home Minister Dilip Walse Patil's instructions to the police to be alart) 

या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस प्रशासनाने सतर्क व दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिले आहेत. 

राज्यात कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज (ता. 23 जुलै) रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने अवस्था भीषण आहे. तसेच कोयना खोऱ्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापुरला देखील पूराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, भिमा खोर्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी उजनी धरणात येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागले आहे. मायनस मध्ये असलेले धरण गुरुवारी सात टक्‍क्‍यांनी प्लसमध्ये आले आहे. धरणातील पाणी पातळी वाढल्याने सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेली उजनी धरण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये मायनस 33 टक्क्यांवर गेले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणे पुर्णपणे भरल्यामुळे पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उजनी धरणात येत असल्याने पाणी पातळी वाढ झाली आहे. उजनी धरणात सध्या दौंड येथून पंधरा हजार 384 क्युसेक तर बंडगार्डन येथून 27 हजार 627 क्युसेक विसर्ग येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ सुरू आहे.


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in