पूजा चव्हाण प्रकरणात गृहमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया...म्हणाले...

पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाले आहेत, तरीही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
anil15.jpg
anil15.jpg

नागपूर : "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी नियमानुसार चैाकशी होईल. या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबाबाखाली नाही. विरोधी पक्ष जे आरोप करीत आहेत, ते चुकीचे आहेत. विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही," असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाले आहेत, तरीही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. याबाबत विचारले असता, अनिल देशमुख म्हणाले की संजय राठोड हे कोठे आहेत, मला माहित नाही. तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. या प्रकरणाच्या चैाकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल.

पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की माझ्या मुलीची बदनामी मीडियाने थांबवावी. तिनं आर्थिक विवेंचनेतून आत्महत्या केली, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले
. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाजही पूजाचा नसल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.

मिटकरी म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की या प्रकरणाची पूर्ण चैाकशी झाल्यानंतर सिद्ध होईल की वनमंत्र्यांचा संबध आहे की नाही, हे स्पष्ट होईल. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी देखील राज्य सरकारच्या शक्ती कायदा समितीवर आहे. जर कोणी या गैरवापर करून एखाद्याला असे बदनाम करून करिअर उद्धस्त करीत असेल तर खपून घेतले जाणार नाही. आँडिओ क्लिप बनावट सुद्धा असू शकते. पूर्ण सत्यता बाहेर आल्याशिवाय कोणीही कुठल्याही निकषापर्यंत जाऊ नये, असे मला वाटतं.

पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीचा आठ दिवसापूर्वी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू की आत्महत्या याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. तिचा भाऊ आणि त्या भावाच्या मित्राचा जवाब नोंदविण्यात आला आहे. आज पुन्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकऱणात एक आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आँडिओ क्लिपमधील संभाषणात सहभागी असलेला एक जण त्यांच्या कुंटुबासह पळून गेला आहे.  

एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आँडिओ क्लिप पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com