फोन टॅपिंग कुणी आणि का केले? अमित शहांनी दिलं उत्तर...

नेत्यांच्या संवादाचीध्वनीफित व्हायरल झाल्याने भाजप अडचणीत आली आहे.
Home Minister Amit Shah reacts on phone tapping in west bengal
Home Minister Amit Shah reacts on phone tapping in west bengal

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये फोन टॅपिंगचा मुद्दा गाजत आहे. महाराष्ट्रात बदली रॅकेटमधील आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या मुद्यावरून राज्य सरकार अडचणी आले आहे. आता पश्चिम बंगालमधील दोन भाजप नेत्यांमधील संवादाची ध्वनीफीत व्हायरल झाली आहे. या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करत भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेत्यांच्या संवादाची ध्वनीफित व्हायरल झाल्याने भाजप अडचणीत आली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात हे नेते बोलत असल्याचे दिसून येते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि पक्षाचे नेते शिशिर बाजोरिया यांच्यातील हा संवाद आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रभावित असे करायचे, याबाबतची चर्चा झाली आहे. 

त्यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूलवरच पलटवार केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, यामध्ये गुपित काहीच नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दोन भाजप नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. याबाबतची मागणी लिखित स्वरूपात दिली आहे. खरा प्रश्न हा निर्माण होतो की, फोन टॅपिंग कुणी केले, असा सवाल उपस्थित करून अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे बोट दाखविले आहे.

शनिवारी बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान झाले. मतदान सुरू असताना भाजपने एक ध्वनीफित जारी केली. त्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधील एका भाजप नेत्याला पुन्हा तृणमूलमध्ये येण्याचा आणि जिंकण्यासाठी मदत करण्याचा आग्रह करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर तृणमूलने लगेच भाजप नेत्यांची ध्वनीफित व्हायरल केली होती.

बंगालमध्ये भाजपचीच सत्ता

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर अमित शहा यांनी भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 27 जागा भाजपली मिळतील. तर राज्यातील 200 हून अधिक जागा जिंकत भाजप सत्तेत येईल. बंगालमध्ये येणारा विविध योजनांचा पैसा भ्रष्टाचारात केला. जनतेच्या पदरी निराशा पडली. कोरोनासह महिला सुरक्षेतही ममता सरकार अपयशी ठरली. आम्ही बंगालमध्ये आशा निर्माण केली आहे. बंगालची जनता भाजपच्या पाठिशी आहे, असे शहा यांनी सांगितले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com