ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा दणका ; सीबीआय चैाकशीचे आदेश

भाजपचे 55 कार्यकर्ते बळी पडले आहेत. ममता बॅनर्जी सरकारने या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले होते.
1MamataBanerjee_170220_20ff.jpg
1MamataBanerjee_170220_20ff.jpg

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी mamata banerjee यांना उच्च न्यायालयाने  high court दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान झालेल्या प्रकरणांची सीबीआयमार्फेत चैाकशी व्हावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने या खटल्याचा निकाल दिला आहे. 

निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची चौकशी आणि तपास सीबीआयच्या देखरेखीखाली व्हावा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.  ममता सरकारला राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांची विशेष टीम नेमून तपास करण्याचेही आदेश दिले आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मानवधिकार आयोगाच्या अध्यक्षांना, विधानसभा मतदानानंतर झालेल्या हिंसाचारा दरम्यान मानवी हक्कांच्या उल्लघंनाच्या आरोपांची चैाकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने दिलेल्या अहवालात ममता बॅनर्जीं सरकारला दोषी ठरविले होते. यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती. 

न्यायमूर्ती चांदीवाल समितीनं परमबीर सिंग यांना  ठोठावला २५ हजारांचा दंड 
बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक ममता बॅनर्जी जिंकल्यानंतर काहींनी संपूर्ण राज्यभर हिंसाचार केला होता. यामध्ये भाजपचे 55 कार्यकर्ते  बळी पडले आहेत. परंतु ममता बॅनर्जी सरकारने  या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले होते. त्यावर सरकारने पांघरूण घालत होते. निवडणुकी दरम्यान असला कोणताही राजकीय हिंसाचार बंगालमध्ये घडलाच नाही, असे उत्तर ममता बॅनर्जी यांनी  दिले होते. परंतु आता कलकत्ता हायकोर्टाने त्यांचा हा दावा फेटाळला आहे. 

निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची चौकशी आणि तपास सीबीआयच्या देखरेखीखाली व्हावा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.  ममता सरकारला राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांची विशेष टीम नेमून तपास करण्याचेही आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com