एक लाख व्यापाऱ्यांना मदत, मोदींकडून शिवराजसिंहांचे कौतुक !  - Help to one lakh traders, Shivraj Singh's appreciation from Modi! | Politics Marathi News - Sarkarnama

एक लाख व्यापाऱ्यांना मदत, मोदींकडून शिवराजसिंहांचे कौतुक ! 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कोरोना संकट त्यानंतर आलेले लॉकडाऊन यामुळे देशभरातील छोटेमोठे उद्योग व्यवसाय ठप्प आहेत.

इंदूर : रस्त्यावरील एक लाख किरकोळ व्यापाऱ्यांसाठी स्वनिधी योजनेतून फायदा करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे अभिनंदन केले आहे.

तर दुसरीकडे आगामी विधानसभा पोटनिवडणूक लढविणाऱ्या एका भाजपच्या आमदारांने आयोजित केलेल्या कलश यात्रेत सोशल डिस्टनिंगची एैसीतैशी उडाली. भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. 

कोरोना संकट त्यानंतर आलेले लॉकडाऊन यामुळे देशभरातील छोटेमोठे उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

चौहान यांनी रस्त्यावरील या व्यापाऱ्यांसाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने स्वनिधीच्या माध्यमातून किमान एक लाख किरकोळ व्यापाऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. 

या योजनेची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे कौतुक केले आहे. मोदी यांनी म्हटले आहे की मी मुख्यमंत्री चौहान आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. गेल्या दोन महिन्यात त्यांनी एक लाख व्यापाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. 

एकीकडे मध्यप्रदेशचे सरकारचे मोदींनी अभिनंदन केले असतानाच दुसरीकडे याच पक्षाच्या एका आमदारांने मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल डिस्टींनिंगचा विचार न करता कलस यात्रेचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात शेकडो पुरूष आणि महिला सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टनिंग एैसीतैशी उडाली मात्र याची फिकीर करतील ते राजकारणी कसले. 

मध्यप्रदेशात 24 जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होत आहे. सनवेर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तुलसी सिलवाट यांनी कलश यात्रेचे आयोजन केले होते. सिलवाट हा विद्यमान मंत्रीही आहेत. मात्र मंत्र्यांनाही कोरोना संकटाचे भान राहिले नाही. या कार्यक्रमावर विरोधी कॉंग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख