फडणवीस, स्थानिकांची नाराजी हिना गावितांना भोवली ; मंत्रिपद हुकले - Heena Gavit lost her ministerial post due to the displeasure of Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

फडणवीस, स्थानिकांची नाराजी हिना गावितांना भोवली ; मंत्रिपद हुकले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

भारतीय जनता पक्षातर्फे दोन वेळा  डॉ. हीना गावित निवडून आल्या आहेत.

जळगाव : आदिवासी चेहरा तसेच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दोनदा मिळविलेले यश,उच्च शिक्षित,ही जमेची बाजू असतानाही केवळ देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याशी वडील आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची फारशी नसलेली जवळीक, स्थानिक पदाधिकारी यांची नाराजी यामुळेच हिना गावित Heena Gavit यांचे निश्चित झालेले मंत्रिपद हुकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नंदुरबार या आदिवासी. बहुल भागात भारतीय जनता पक्षातर्फे दोन वेळा  डॉ. हीना गावित निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे नंदुरबार हा एके काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, अगदी राज्यात कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास नंदुरबार जिल्ह्यातून काँगेस त्याची सुरुवात करीत असे, अगदी देशातील आधार कार्ड चा शुभारंभ याच जिल्ह्यातून काँगेस सरकारच्या काळात करण्यात आला होता.

त्याच काँग्रेस पक्षाचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हीना गावित यांनी पराभव केला. तब्बल नऊ वेळा निवडून आलेले काँग्रेस चे माणिकराव गावित यांचा त्यांनी पराभव केला.डॉ.हीना गावित यांचे वडील डॉ विजयकुमार यांची या जिल्ह्यात चांगली राजकीय पकड आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते त्यावेळीं त्यांनी जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी खासदार, आमदार भाजपचा तसेच जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात घेतली. या जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस आले. मात्र या पंचवार्षिक मध्ये जिल्हा परिषद मधील भाजपची सत्ता गेली, नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली नाही.त्यात भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी गावित यांच्यत अंतर्गत धुसफूस असल्याचे सांगितले जाते. 

देवेंद्र फडणवीस, आमदार जयकुमार रावल यांच्याशी आमदार विजयकुमार  गावित यांच्याशी फार सख्य नव्हते, तर नंदुबार भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी यांची फडणवीस यांचशी असलेली जवळीक अशी अंतर्गत धुसफूस असल्याचे सांगितले जात होते. डॉ. हीना गावित यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यास अनेक जमेच्या बाजू होत्या, आदिवासी चेहरा म्हणून त्यांचे नावही यादीत होते.मात्र त्यांना याच भाजपतील अंतर्गत वादाचा फटाका बदलत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच ऐनवेळी त्यांचे नाव कट होवून  नाशिक जिल्ह्यात भारती पवार याना संधी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख