मुंबईबाबत बरळणाऱ्या मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात  - Health Minister Rajesh Tope criticizes Kangana Ranaut | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईबाबत बरळणाऱ्या मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावले उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्‍मीरने मतदान केले आहे का? मुंबई पोलिस हे पाकिस्तानचे पोलिस आहेत का? असा सवालही टोपे यांनी भाजपला उद्देशून केला आहे. 

मुंबई : मुंबई ही पाकव्याप्त काश्‍मीरसारखी वाटत असल्याचे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौटवर राज्यभरातून दिवसभर टिकेची झोड उठली आहे. भाजपने सावध भूमिका घेत यातून अंग काढून घेतले असले तरी इतर सर्वच राजकीय पक्षांनी कंगनाला फैलावर घेतले आहे. 

एरवी तोलून मापून बोलण्यासाठी ओळखले जाणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही अत्यंत शेलक्‍या शब्दांत कंगनाचा समाचार घेतला आहे. मुंबई शहराविषयी काहीही बरळणाऱ्या "अशा मेंटल केसेस' आरोग्य खात्याने हाताळाव्यात, अशी सूचना करत टोपे यांनी कंगनाला सुनावले आहे. 

मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावले उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्‍मीरने मतदान केले आहे का? मुंबई पोलिस हे पाकिस्तानचे पोलिस आहेत का? असा सवालही टोपे यांनी भाजपला उद्देशून केला आहे. 

झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत. "ड्रग्स'च्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कुणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि अशा व्यक्तीला कोणी पाठिंबा देत असेल, तर देशाचे राष्ट्रीयत्व किती खालच्या पातळीवर गेले आहे, हे दिसून येते, अशीही पुस्तीही आरोग्य मंत्री टोपे यांनी जोडली आहे. 

हेही वाचा : कंगनावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा

मुंबई : मुंबई पोलिस आणि मुंबईबाबत धक्कादायक विधाने करणाऱ्या कंगना रनौटबाबत राज्यभरात राजकीय पक्ष, मराठी सिनेविश्‍व, तसेच सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरीही कंगना मागे हटयाला तयार नाही. "मी येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत असून कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून द्यावा, असे आव्हान तिने दिले आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतित्त्युर देण्यात आले आहे. 

मी येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत असून कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवावे, असे आव्हानच तिने दिले. त्यावर मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. 

खोपकर यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, कंगनाच एअरपोर्टवर मनसे स्टाइल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सुक आहेत, असं कुणाला वाटत असेलही. पण, कुणाला किती महत्त्व द्यायचं, हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची, ही एक विकृतीच आहे. या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे, हेही आम्हाला नीट माहिती आहे. 

एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वतः प्रकाशझोतात राहायचं, असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे. म्हणूनच आमच्या दोन मागण्या आहेत. त्या म्हणजे कंगनावर त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू करण्यात यावेत. मुंबईला पाकव्याप्त कश्‍मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खोपकर यांनी ट्‌विटमध्ये केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख