रामदेव बाबा म्हणतात, अॅलोपॅथी फालतू! आरोग्यमंत्र्यांचं खरमरीत पत्र... - Health Minister HarshVardhan tells Ramdev Baba Withdraw remarks about Allopathy | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

रामदेव बाबा म्हणतात, अॅलोपॅथी फालतू! आरोग्यमंत्र्यांचं खरमरीत पत्र...

वृत्तसंस्था
रविवार, 23 मे 2021

रामदेव बाबा अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अडचणी आले आहे.

नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. व्हॅाट्स अॅपरील एका मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यावर नाराजी व्यक्त करत खरमरीत पत्र लिहिलं आहे. (Health Minister HarshVardhan tells Ramdev Baba Withdraw remarks about Allopathy)

रामदेव बाबा अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अडचणी आले आहे. नुकत्याच एका शिबीरामध्ये त्यांनी अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. व्हॅाट्स अॅप मेसेज वाचून दाखवताना त्यांनी लाखो लोक अॅलोपॅथीच्या औषधांमुळं मरत आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना तापासाठी दिल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधालाही फालतू म्हटलं. रामदेव बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर IMA ने त्यावर आक्षेप घेतला.

हेही वाचा : मुंबईला शक्य पण आम्ही लस खरेदी केली तर दिवाळं निघेल! मुख्यमंत्रीच झाले हताश

IMA ने रामदेव बाबांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. अखेर डॅा. हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. 'संपूर्ण देशवासियांसाठी कोरोना काळात दिवस-रात्र लढणारे डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासमान आहेत. रामदेव बाबांच्या वक्तव्याने त्यांचा अपमान झाला असून देशवासियांच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्यामुळे आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केलं आहे.

अॅलोपॅथी औषधे आणि डॅाक्टरांवरील तुमचे वक्तव्याने देशवासियांना दु:ख झाले आहे. या भावना फोनवरून आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत. तुम्ही काल आपल्या वक्तव्याबाबत जो खुलासा केला आहे, तो पुरेसा नाही. कोरोना काळात अॅलोपॅथी आणि संबंधित डॅाक्टरांनी कोट्यवधी लोकांना जीवनदान दिले आहे. त्यामुळं अॅलोपॅथी औषधांमुळं लाखो लोकांचा जीव गेला, असं म्हणने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. अॅलोपॅथी पध्दतीला तमाशा, फालतू म्हणनेही खूप खेदजनक आहे, असे पत्रात नमूद केलं आहे.

आज लाखो लोक बरे होऊन घरी जात आहेत. कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ १.१३ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांहून अधिक आहे. यामागे अॅलोपॅथी आणि डॅाक्टरांचे मोलाचे योगदान आहे, असे हर्षवर्धन यांनी पत्रात म्हटलं आहे.

Edited By Rajanand More

'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख