पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक... - The health of the first Hindkesari Shripati Khanchanale is critical | Politics Marathi News - Sarkarnama

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते अतिदक्षता विभागात असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

शहाऐंशी वर्षीय खंचनाळे यांना गेल्या चार दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील आहेत. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या आहेत. 

हेही वाचा : पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ 
कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या काही दिवसापासुन जोर धरत आहे. या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली दरबारी ही मागणी पोहचवू असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. स्वातंत्र्यांनंतर भारताच्या पदरात पहिले ऑलिम्पिक पदक टाकणारे महाराष्ट्राचे मल्ल पै.खाशाबा जाधव यांना आजतागायत पद्म पुरस्काराने गौरवले नाही. शासकीय पातळीवर क्रीडाविषक धोरणात असणारी अनास्था दूर व्हावी, यासाठी कुस्ती मल्लविद्या महसंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे चळवळीच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिफारस पत्र देऊन सहभाग नोंदवला आहे.शिष्टमंडळाने संभाजीराजे यांची भेट घेत, दिल्लीच्या क्रीडा मंत्रालयाकडे तसेच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यापर्यंत ही मागणी पोहचवावी, अशी विनंती केली. संभाजीराजे यांनी दिल्ली मध्ये क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची भेट घेऊन लवकरात लवकरत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख