अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं हे कारस्थान...हसन मुश्रीफांचा आरोप - hasan mushrif slams bjp over cbi raid on anil deshmukh home | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं हे कारस्थान...हसन मुश्रीफांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

कोल्हापूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर व कार्यालयावर आज छापा मारला आहे. त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. हसन मुश्रीफ hasan mushrif प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अनिल देशमुख Anil Deshmukhआणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले की, याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईलच. देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे, हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. 

मुश्रीफ म्हणाले, ''केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल. अनिल देशमुख या प्रकरणातून लवकरच निर्दोष बाहेर पडतील. ''

अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने आज छापा टाकला आहे. देशमुख यांचे मुंबई , नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे. शंभर कोटी गैरव्यवगारप्रकरणी अनिल देशमुख यांनी नुकतीच चैाकशी झाली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. 

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.  राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख