Maratha Reservation : आयोग न नेमता राणे समिती नेमल्याची सरकारनं चुक केली..

राजकारण न करता ती चुक दोघांनी मान्य केली पाहिजे.
Sarkarnaa Banner (28).jpg
Sarkarnaa Banner (28).jpg

कोल्हापूर : "लोकप्रतिनिधींचा मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे  मराठ्यांना राजकारणात नव्हे तर शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. गेल्यावेळी सरकारने नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती, पण आयोग नेमला नव्हता. आयोग न नेमता समिती नेमल्याची चुक सरकारनं केली. यावर आता राजकारण न करता ती चुक दोघांनी मान्य केली पाहिजे. मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे," असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. Hasan Mushrif reaction to the Maratha reservation movement

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनास कोल्हापुर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सतेज पाटील, धनंजय महाडिक, धैयशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे,  आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत पहिल्या टप्यात पाच जिल्ह्यात हे आंदोलन होत आहे.  खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली होती.  राज्यातील सध्याच्या राजकारणात शिळेपणा आलेला आहे. त्यामुळे राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात राज्यातील राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असे वक्तव्य अॅड. आंबेडकर यांनी केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता दोनच पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे आंबेडकर म्हणाले होते. 
 

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजे यांचीही भेट घेतली. ही भेटही ऐतिहासिक ठरली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट संभाजीराजेंनी घेतली आहे. त्यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण अद्याप सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते आजपासून आंदोलनाला सुरूवात झाली. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com