हरि नरकेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना धरले धारेवर

राजकीय पक्षांमध्ये आरक्षणावरुन आरोप प्रत्यांरो सुरु आहेत.
 Hari Narke .jpg
Hari Narke .jpg

पुणे : राज्यात सध्या ओबीसी (OBC) आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये आरक्षणावरुन आरोप प्रत्यांरो सुरु आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपला धारेवर धरणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. (Hari Narke criticizes Mahavikas Aghadi leaders) 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात मांडलेल्या भूमिकेविषयी नरके यांनी "राजकिय नेते आणि ओबीसी प्रश्न" अशी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये नरके म्हणाले की, राज्यसभा खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना ओबीसी प्रश्नावर मत विचारले गेले तर ते म्हणाले, "मी या विषयावर बोलणार नाही. जे यावर काम करताहेत त्यांनी बोलावे.  

तर माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांना ओबीसी आरक्षण, राज्य मागासवर्ग आयोग आणि इंपिरिकल डाटा यावर प्रश्न विचारला तर ते जुन्या गोष्टी बोलत राहिले. त्यांना गेल्या ६ महिन्यातील राज्य पातळीवरील ओबीसी आरक्षण विषयक घडामोडी माहीतच नव्हत्या, असे नरके यांनी म्हटले आहे.  

ओबीसी खात्याचे म्हणजे बहुजन कल्याण खात्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना, त्यांनी तर सिक्सरच मारला. ते म्हणाले ओबीसीचा इंपिरिकल डाटा हा माझ्या खात्याचा विषयच नाही. तो ग्रामीण विकास खात्याचा (हसन मुश्रीफ) यांचा विषय आहे. कमालच झाली. याला जबाबदारी झटकणे असे म्हणतात. हसन मुश्रीफ यांनी गेल्या साडेसहा महिन्यात ओबीसी हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाही, अशा प्रकारे ओबीसींच्या महत्त्वाच्या प्रश्नावर नेत्यांनी उत्तरे दिल्याचे नरके यांनी म्हटले आहे.   

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com