कॅाग्रेसने सोपवली हार्दीक पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी... 

हार्दिक पटेल यांना आता कॅाग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात कॅाग्रेस कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Hardik Patel.jpg
Hardik Patel.jpg

पुणे : पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दीक पटेल होता. हार्दिक पटेल यांना आता कॅाग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात कॅाग्रेस कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातमध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी कॅाग्रेसने हार्दीक पटेल यांच्यामाध्यमातून नवा युवा चेहरा दिला आहे. हार्दिक पटेल यांची तत्काळ नियुक्ती करायला परवानगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिली असल्याची माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिली. सध्या अमित चावडा हे गुजरात कॅाग्रेसचे अध्यक्ष आहेत.

पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये मोठं आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हार्दिक पटेल यांच्या नियुक्तीबरोरबरच काँग्रेसने महेंद्रसिंग परमार यांना आणंद, आनंद चौधरी यांना सूरत आणि यासीन गज्जन यांची देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.  


कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना हार्दीक पटेल म्हणाले, ''गुजरातमधील सर्वसामान्य जनेतेपर्यंत पोहचणार असून पक्षबांधणीचे चांगेल काम करायचे आहे.

2022मधील निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये 120 जागेवर विजय मिळवून सरकार स्थापन करणार आहोत.''  गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दीक पटेल कॅाग्रेसमध्ये सामील झाले होते. गांधीनगर येथील एका रॅलीमध्ये कॅाग्रेसचे नेता राहुल गांधी यांच्या उपस्थित त्यांनी कॅाग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॅाग्रेसमध्ये सामील झाल्यावर ते खूप सक्रीय झाले आहेत. 

 
हार्दीक पटेल यांचा जन्म 20 जुलै 1993मध्ये गुजराती पटेल परिवारात झाला. 31 अॅाक्टोंबर 2012 रोजी त्यांनी पाटीदार समाज युवा संघटना सरदार पटेल ग्रुपमध्ये सामील झाले होते. एका महिन्यात ते अध्यक्ष झाले होते. अशाच प्रकारे कॅाग्रेसमध्ये सामील होऊन त्यांना फार महिने झाले नाही, त्यातच त्यांच्यावर कॅाग्रेसने गुजरात कॅाग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

आॅगस्ट 2015 मध्ये अहमदाबाद येथील जीएमडी मैदानार हार्दीक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी रॅली काढली होती. या रॅलीनंतर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली होती. या घटनेनंतर हार्दीक पटेल व त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हार्दीक पटेल यांना अटक करण्यात आली होती. 
   
Edited  by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com