"Happy Birthday tutu " : तेजस्वी यादवांना चाहत्यांच्या उद्यासाठीही शुभेच्छांचा वर्षाव !  - "Happy Birthday tutu": Happy Birthday to Tejaswi Yadav! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

"Happy Birthday tutu " : तेजस्वी यादवांना चाहत्यांच्या उद्यासाठीही शुभेच्छांचा वर्षाव ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनीही आपल्या प्रिय लहान भावाला शुभेच्छा दिल्या आहे

 नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांना उद्यासाठीही आजपासून शुभेच्छा देण्यास सुरवात झाली आहे. कारण बिहारच्या मतमोजणीला काही तासानंतर सुरवात होणार आहे. 

बिहारचे उद्या काय निकाल लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थात सर्वच वाहिन्यांनी राजद आणि कॉंग्रेस आघाडीला सत्ता मिळेल असा अंदाजही व्यक्त केला आहे. जर आघाडीची सत्ता आली तर अर्थात तेजस्वी हे बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यासाठी आणखी एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनीही आपल्या प्रिय लहान भावाला शुभेच्छा दिल्या आहे. तेजप्रताप यांच्याप्रमाणेच त्यांना कॉंग्रेससह सर्वच पक्षांनी शुभेच्छा दिल्या आहे. पुढचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यांच्याकडे पाहिले जात असले तरी तेजस्वी यांनी काहीसे सबुरीचे धोरण स्वीकारलेले दिसते. जल्लोषाला आताच सुरवात करू नका निकालाची प्रतीक्षा करा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

दहा नोव्हेबरला म्हणजे उद्या बिहार विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. बिहारच्या सिंहासनावर कोण आरूढ होणार नितीशकुमार की तेजस्वी की आणखी कोण याची उत्सुकताही शिगेला पोचली आहे.र्‌ एक्‍झीट पोलमध्ये तेजस्वी सर्वात पुढे आहेत. तेच मुख्यमंत्री बनणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर बिहारी जनतेमध्येही आनंदराचे वातावरण आहे. उद्या निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी तेजस्वींचा वाढदिवस आल्याने त्यांच्या आजच्या वाढदिवसाची चर्चा सोशल मीडियावर होणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. 

बिहारचे मतदान संपल्यानंतर एनडीटीव्हीने राजद-कॉंग्रेसला 128, भाजप-जेडीयूला 99, एजपीजीला 6 तर अन्य पक्षांना दहा जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. एनडीटीव्हीप्रमाणे इतर वाहिन्यांनीही कमी जास्त प्रमाणात तेजस्वी हेच आघाडी घेतील असे म्हटले आहे. 243 जागांसाठी मतदान झाले होते. मॅजिक फिगर गाठण्यासाठी 112 आकडा लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल तोच मुख्यमंत्री होणार आहे. 

यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तेजस्वी यादव यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे, की तेजस्वी यादव यांना वाढदिवसाच्या ऐतिहासिक शुभेच्छा. तर तेजप्रताप यादव यांनी भावाला टोपन नावाने शुभेच्छा देताना म्हटले आहे  "Happy Birthday tutu " 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख