मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना धक्का.. राणेंनी वैभववाडीचा गड राखला

मालवण मध्ये ६ पैकी ५ ग्रामपंचायत वर भाजपची एकहाती सत्त मिळाली आहे.
vn18.png
vn18.png

मालवण :  मालवण मध्ये ६ पैकी ५ ग्रामपंचायत वर भाजपची एकहाती सत्त मिळाली आहे. चिंदर, पेंडुर, गोळवण, कुंनकवळे, मसदे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. तर आडवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकाविला आहे. 


नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला

भाजपचे नेते नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. तर शिवसेनेकडे अवघ्या 4 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.

खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत ग्रामस्थांची नोटाला पसंती
 खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत धनगरवाडी ग्रामपंचायतीत येथील ग्रामस्थांनी नोटाला पसंती दिली आहे. येथील ग्रामस्थांनी दोन्ही वॉर्डमध्ये उमेदवारांना नाकारत नोटाला मतदान केले. नोटाला अनुक्रमे २११ व २१७  असे मतदान झाले आहे. त्यामुळे येथील निवडणूक रद्द होऊन पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आज मतमोजणीत धनगरवाडी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी चक्क नोटालाच पसंती दिल्याचे उघड झाले. या ग्रामपंचायतीत सात जागा असून तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. तर दोन जागांवर अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. पण मतदारांनी उमेदवारांना मते देण्याऐवजी नोटाला पसंती देऊन दोन्ही वॉर्डमधील उमेदवारांना नाकारले. परिणामी ही निवडणूक रद्द होऊन पुन्हा निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारांना नाकारून नोटाला पसंती देण्याचा प्रकार प्रथमच झाला आहे. 

पाटणमध्ये राष्ट्रवादीला धक्का : शंभूराज देसाईंच्या गटाची आघाडी 
पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तर विरोधी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.मंत्री देसाई यांच्या स्थानिक गटाने आतापर्यंत पाटण तालुक्यातील २० ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवित सत्ता मिळविली आहे. तर विरोधी राष्ट्रवादीच्या गटाची केवळ सातच ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया झाली. यामध्ये ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात ७२ ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. आज झालेल्या मतमोजणीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे.यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती : मुळगांव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे, हुंबरळी, चोपदारवाडी,  मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द, कातवडी, मुंद्रुळहवेली, ठोमसे, आंबळे. राष्ट्रवादीचे नेते 
सत्यजितसिंह पाटणकर गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये काळोली , मेंढेघर , तामकडे , नेचल, सुळेवाडी, मेंढोशी, चिटेघर, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अद्याप काही ग्रामपंचायचतींचा निकाल जाहीर झालेला नाही. पण सध्यातरी २० ग्रामपंचायतींवर मंत्री देसाई यांच्या स्थानिक गटांची सत्ता आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com