पुतण्याचा पराभव विजयसिंह मोहिते पाटलांच्या जिव्हारी - Gram Panchayat, Election State attention to Akluj Gram Panchayat result | Politics Marathi News - Sarkarnama

पुतण्याचा पराभव विजयसिंह मोहिते पाटलांच्या जिव्हारी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना धक्का बसला आहे.

पंढरपूर : अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे संग्राम सिंह मोहिते-पाटील यांना गिरीराज माने-पाटील यांनी पराभूत केले आहे.

जनसेवा संघटनेचे डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे दोन उमेदवार या वादातून झालेल्या 17 पैकी तीन उमेदवार डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांची विजयीडाॅ. धवलसिंह मोहिते पाटील पॅनलचे गिरीराज माने पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे. ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांना पराभूत केले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात मोठ्या चुरसीने निवडणूक झाली आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती  सत्ता आहे. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आवाहन दिले होते. 

येथील 17 जागा पैकी एक जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले. मतदाना दरम्यान दोन गटात बाचाबाचीचे प्रकार देखील झाले आहेत. सकाळी माळशिरस येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे.  निकलामध्ये कोण बाजी मारणार याकडेच राज्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकालानंतर  मिरवणूक,बॅनबाजी आणि गुलाल उधळणीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना धक्का..

मालवण :  मालवण मध्ये ६ पैकी ५ ग्रामपंचायत वर भाजपची एकहाती सत्ता मिळाली आहे. चिंदर, पेंडुर, गोळवण, कुंनकवळे, मसदे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. तर आडवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकाविला आहे. 

भाजपचे नेते नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. तर शिवसेनेकडे अवघ्या 4 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.

खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत धनगरवाडी ग्रामपंचायतीत येथील ग्रामस्थांनी नोटाला पसंती दिली आहे. येथील ग्रामस्थांनी दोन्ही वॉर्डमध्ये उमेदवारांना नाकारत नोटाला मतदान केले. नोटाला अनुक्रमे २११ व २१७  असे मतदान झाले आहे. त्यामुळे येथील निवडणूक रद्द होऊन पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख