'या' ग्रामपंचायतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष....

अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आवाहन दिले आहे.
0325_1.jpg
0325_1.jpg

पंढरपूर : आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात मोठ्या चुरसीने निवडणूक झाली आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती   सत्ता आहे. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आवाहन दिले आहे.

येथील 17 जागा पैकी एक जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले आहे. मतदाना दरम्यान दोन गटात बाचाबाचीचे प्रकार देखील झाले आहेत.

सकाळी माळशिरस येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे.  निकलामध्ये कोण बाजी मारणार याकडेच राज्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निकालानंतर  मिरवणूक,बॅनबाजी आणि गुलाल उधळणीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
 
अमरावती १० वाजल्यापासून सुरु होणार मतमोजणी 
अमरावती  जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान शुक्रवारी  झाले. त्याची मतमोजणी आज १० वाजल्यापासून सुरु होणार आहे  मतमोजणी हि त्याच ठिकाणच्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, दुपार पर्यंत सर्व कौल हे आहाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात 18 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com