ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही..फडणवीसांचा टोला - graduate-teacher constituency election result Devendra Fadnavis criticize Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही..फडणवीसांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

आता आम्हाला त्यांची ताकद कळाली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू. नव्याने व्युहरचना करू.

मुंबई  : "विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे वेगळे लागले आहे. भाजपच्या नेत्यांनी मेहनत केली होती. पण तीन पक्ष एकत्र आल्याने आमच्या आकलनात चुक झाली. सरकारी यंत्रणेने मतदार नोंदणी केली. मतदार नोंदणीत आम्ही कमी पडलो. आम्हाला मतदार नोंदणीची संधी मिळाली नाही," असे विरोधी पक्षनेते, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

फडणवीस म्हणाले की तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद कळाली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू. नव्याने व्युहरचना करू.  पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपला अपयश आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपचा धुव्वा उडवला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं"

भाजपने आता तरी सुधारावे.. देशमुखांचा टोला 

मुंबई : "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात नाकारून महाराष्ट्रातील जनतेने आपला संताप व्यक्त केला आहे. जनभावनेचा आदर करून भाजपाने आता तरी सुधारावे आणि सरकारला अडचणीत आणण्यासाठी महाराष्ट्राचा अपमान करू नये," असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. देशमुख म्हणाले, "एकेकाळी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस एकेकाळी निवडून आले होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला येथील मतदारांनी नाकारले आहे."

हिंमत असेल तर एकटे एकटे लढा..चंद्रकांतदादांचे आव्हान
मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपला अपयश आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपचा धुव्वा उडवला. या निकालाबाबत भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी त्यांना चॅलेंज देतो हिंमत असेल तर एकटे एकटे लढा. शिवसेना सोबत असती तर बळ मिळलच असतं.पण ते सोबत नाही. त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत." चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपाला निवडून द्यायच नाही, हा एकच झेंडा महाविकास आघाडीचा आहे. प्रत्येक पक्षाची वोट बॅक असते. आमचा मित्र पक्ष (शिवसेना) त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र पाहायला मिळालं आहे. शिवसेनेला या निवडणुकीत भोपळा मिळाला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून त्यांना उमेदवार निवडता येत नाही
." "मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात त्यांना बोलू द्या.शक्यतो ते खालच्या पातळीची वक्तव्य कधीही करत नाही," असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख