एकीकडे मंत्र्यांना शपथ अन् लगेच CBI ला खटला चालवण्यास राज्यपालांकडून परवानगी - Governor Jagdip dhankhar allows CBI to prosecute Narada scam case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

एकीकडे मंत्र्यांना शपथ अन् लगेच CBI ला खटला चालवण्यास राज्यपालांकडून परवानगी

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

सात खासदार, चार मंत्री, एक आमदार आणि एका पोलिस अधिकाऱ्याचे स्टिंग अॅापरेशन करण्यात आले होते.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तिसऱ्यांदा बहुमत मिळवत सत्तारुढ झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. राजभवनात ममतादीदींच्या मंत्रीमंडळातील 43 मंत्र्यांना आज शपथ देण्यात आली. त्यातील दोन मंत्र्यांसह दोन माजी मंत्र्यांवर नारजा घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्यास राज्यपालांनी आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीबीआयकडून या चौघांविरोधात आता खटला चालवला जाईल. (Governor Jagdip dhankhar allows CBI to prosecute Narada scam case)

बंगालमध्ये राज्यपाल व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये सातत्याने वाद होत आले आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या हिंचासारावरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त करत सरकारवरच ताशेरे ओढले होते. हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता ममतादीदींच्या मंत्रीमंडळातील 43 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामध्ये ममतांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांसह पहिल्यांदाच निवडून आलेल्या नेत्यांनाही संधी दिली आहे. नव्या-जुन्याचा ताळमेळ साधत त्यांनी मंत्रीमंडळाची रचना केली आहे.

हेही वाचा : अॅालिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार; युवा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणीत लूक आऊट नोटीस

आज मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी नेत्यांवर सीबीआयला खटला चालविण्यास परवानगी दिल्याची बातमी धडकली. त्यामध्ये आज शपथ घेतले सुब्रत मुखर्जी व फिरहाद हकीम तसेच माजी मंत्री शोभन चटर्जी, मदन मित्रा आदींचा समावेश आहे. त्यामुळे तृणमुलच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

काय आहे नारदा घोटाळा?
नारदा घोटाळा हा स्टिंग अॅापरेशनमधून समोर आला होता. 2014 मध्ये तृणमूलचे सात खासदार, चार मंत्री, एक आमदार आणि एका पोलिस अधिकाऱ्याचे स्टिंग अॅापरेशन करण्यात आले होते. एका प्रकल्पासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली होती. बंगालमध्ये 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या स्टिंग अॅापरेशनचा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला. त्यानंतर बंगालसह दिल्लीतही खळबळ उडाली. आता पुन्हा एकदा हा घोटाळा चर्चेत आला आहे. 

सुवेंदू अधिकारी यांना दिलासा

नारदा घोटाळ्यामध्ये विरोधी पक्षनेते व तत्कालीन मंत्री सुवेंदू अधिकारी यांचेही नाव समोर आले होते. सध्या सुवेंदू हे भाजपमध्ये आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर खटला चालविण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे सीबीआय त्यांच्यावर खटला चालवणार नाही. मात्र, राज्यपालांनी तृणमूलच्या मंत्र्यांवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. सीबीआयने याबाबत राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. त्यावरून आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख