अकोला : "महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये प्रायव्हेट प्रोफेशनल शिक्षणाचा कायदा केला. त्या कायद्याच्या कलम ४ व ५ प्रमाणे ५० टक्के आरक्षण देण्यात आले. २७ टक्के आरक्षण ओबीसी, १३ टक्के आरक्षण एस सी व ७ टक्के आरक्षण ट्रायबलला देण्यात आले. कायद्यामध्ये या तरतुदी असूनही शासनाने ओबीसी, एससी व ट्रायबल मधील लोकांची फसवणूक केली आहे," असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
२००६ मध्ये महाराष्ट्र सरकारने शिक्षणाबाबत कायदा केला. त्यात ओबीसी, एससी व ट्रायबलला ५० टक्के आरक्षण देण्यात आले. असे असताना त्याच वर्षी शासनाने एक पत्रक काढून खाजगी संस्थानांमध्ये ५० टक्के आरक्षण शिवाय ते अर्धवट राहतील अशी तरतूद केली. सरकारच्या या फसवणुकी विरोधात आम्ही अनेक वर्षे लढत असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला ओबीसीचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. शिवाय मतदार देखील आहेत. त्यामुळे सरकारकडून आम्ही अपेक्षा करतो. मागच्या सरकारने केलेली ही फसवणूक मग तो भाजपा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो २००६ मध्ये शासनाने काढलेले ते पत्रक रद्द करतील, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ५० टक्के आरक्षण खाजगी संस्थानांमध्ये लागू करतील," अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
येत्या पंधरा दिवसात ही दुरुस्ती करण्यात आली नाही तर काढलेल्या पत्रका विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू असा इशाराही प्रकाश प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
नरेंद्र पाटलांची सन्मानपूर्वक पुनर्नियुक्ती करा; नियुक्त्या रद्द केल्याने माथाडी संघटनात नाराजी #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #Honorable #Reappointment #NarendraPatil #MathadiOrganization #Dissatisfiedhttps://t.co/l4Ehf30qqA
— Sarkarnama (@MySarkarnama) November 10, 2020
हेही वाचा : गडकरी यांच्या घरासमोर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन सुरू..
बुलढाणा : विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येत आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर, स्वाभीमानी संघटना विदर्भाचे अध्यक्ष दामोदर इंगोले व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी साजरी करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. अकोला येथे केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे व जालना येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

