अधिवेशनातून सरकार पळ काढत आहे...फडणवीसांची टीका

फडणवीस म्हणाले की,तीन पाटाचं हे सरकार आहे, कोण कोणाचं पाट ओढतयं ते कळत नाही.
1dvendra_20fadnavis_uddhav_20thackeray.jpg
1dvendra_20fadnavis_uddhav_20thackeray.jpg

मुंबई : "राज्याचं तथाकथित अर्थसंकल्प अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. इतिहासातील हे सगळ्यात लहान अधिवेशन आहे. राज्य सरकार अधिवेशनपासून दूर पळत आहे. कोणतीही चर्चा होऊ नये, म्हणून ही सरकारची स्ट्रॅटेजी आहे," अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.  

फडणवीस म्हणाले की, तीन पाटाचं हे सरकार आहे, कोण कोणाचं पाट ओढतयं ते कळत नाही. सरकारचं एकमेव काम म्हणजे बदल्या करणे, यासाठी बोल्या लावल्या जात आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये सरकार भ्रष्टाचार करीत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, आम्ही मुद्दा लावून धरणार, शेतकऱ्यांना सरकारने कोणतीच मदत केली नाही, नुसत्या घोषणाच सरकार करीत आहे.  
 
वीजबिलाबाबत फडणवीस म्हणाले की, वीज बिल कमी झालं म्हणून पाट थोपटून घेतली होती, आमच्या काळात तो निर्णय झाला होता. आता एप्रिलपासून दोनदा वीज बिल वाढले, न वापरलेल्या विजेचे पैसे लावले आहेत. लोकांना काम नाहीत, अडचणीत असताना लोकांकडून पैसे घेण्यासाठी "वीज बिलाच सक्तवसुली संचालनालय" सरकारने सुरू केल आहे. ही मोगलाई आहे का, कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांच्या बदल्यात भ्रष्टाचार सुरू आहे. पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधी पाहिली नाही.

फडणवीस म्हणाले, "राज्यात महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. सत्ता पक्षाचे मंत्री आणि नेते स्वतःच सातत्याने या प्रकरणात आघाडीवर आहेत. ऑडिओ, फोटो पुरावे असताना तक्रार दाखल होत नाही, पोलिसांची इतकी लाचार अवस्था आम्ही कधी पाहिलेली नाही. ज्या पीआयकडे चौकशी आहे, सरकारची लाचारी ते करत असतील, कोणतीही कारवाई ते करत नसतील तर त्यांना निलंबित करावे. संजय राठोड यांना वरिष्ठांचा पाठिंबा आहे. 

राज्यात या सरकारचा चेहरा उघडा झाला आहे. औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई होत नाही, धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्या महिलेलने केस मागे घेतली असली तरी विषय संपलेला नाही. सत्ता पक्षातील लोकांना लैंगिक स्वैराचाराची मुभा देण्यात आली आहे ?शक्ती कायदा हा फार्स आहे. शक्ती कायद्याच्या समितीतून भाजपचे सगळे सदस्य राजीनामा देतील, आम्ही अशा प्रकारे काम करू शकत नाही."

सगळे पुरावे आम्ही मांडणार...

फडणवीस म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंतीला अभिवादन देखील मुख्यमंत्री करत नाहीत, ही लाचारी आहे.काँग्रेसने जन्मभर सावरकरांवर अन्याय केलाच, पण त्याही पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा अन्याय होत आहे. अनेक वर्ष सेनेबरोबर काम केलं, त्यासाठी त्यांना सल्ला देतो, सत्ता येते जाते, पण इतिहासात नोंद होत असते. काँग्रेसच्या नादाला लागून सावकरांना डावलू नका. 

आम्ही सीमा प्रश्नावर सरकारच्या सोबत आहोत. संभाजी नगरच्या नामकरणाला कोविड मधला भ्रराष्टाचार हा मोठा संतापजनक मुद्दा आहे. सगळे पूरावे आम्ही मांडणार आहोत. त्या संदर्भात एक पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत

नामदेवांचं नाव त्यात येऊ का शकत नाही ?
"संत नामदेवाची जयंतीनिमित्त कुठेही कार्यक्रम नाही, याबाबत मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीही सरकार याबाबत काहीही करीत नाहीत. राज्यातील अति महत्वाच्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो, पण, नामदेवांचं नाव त्यात येऊ का शकत नाही ? सरकारला विनंती आहे, त्यांनी या संदर्भात तत्काळ कार्यक्रम जाहीर करावा," असे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com