हे सरकार..हम करेसो कायदा..सारखं वागतेय : चंद्रकांत पाटलांची टीका  - This government is not studying, it is not taking advice Uddhav Thackeray is not ready to leave Matoshri said Chandrakant Patil. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

हे सरकार..हम करेसो कायदा..सारखं वागतेय : चंद्रकांत पाटलांची टीका 

सागर आव्हाड
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

"मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करीत नाही, सल्ला घेत नाही..हम करेसो कायदा सारखं वागतेय.. 

पुणे : "मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करीत नाही, सल्ला घेत नाही..हम करेसो कायदा सारखं वागतेय.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडायला तयार नाहीत," अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज्यपाल भाजपला झुकत माप देतात, अशी चर्चा आहे तर त्याबाबत राज्यपालांनाच विचारा मी त्यावर बोलणार नाही, राज्यपाल पदाची गरिमा राखली गेली पाहिजे, अशी चर्चा करणारे ती राखत नाही मात्र राज्यपालबाबत असे मी बोलणार नाही."

कोरोना काळात लॅाकडाउनमुळे एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे परिवहन मंडळाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्याचे पगार रखडले आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की  एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आत पगार दिलाच पाहिजे, आमचं सरकार जाण्याआधी पाचशे कोटोंची मदत दिली होती.  आता कर्ज काढावे लागेल, असे म्हणत असतील तर एसटी स्टँडस तारण ठेवावी लागतील, असा टोमणा पाटील यांनी राज्य सरकारला हाणला. 

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणा स्थगिती उठवली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण बाबत अनेक मुद्दे यावेळी मांडले. महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्न नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे आहे. हा प्रश्न राज्य सरकार, केंद्राकडे राहिलेला नाही,  सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत 
मराठी भाषिक लोकांना जाच कमी होईल हे बघितलं पाहिजे, असे ते म्हणाले.एकनाथ खडसे यांच्या बाबत विचारले असता ते म्हणाले, "आमच्या साठी आता हा विषय संपला आहे."  राज्यपाल नियुक्त 12 आमदाराच्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं. 

हेही वाचा : मराठा गोलमेज परिषदेत आज होणार महत्वाचे निर्णय 
सातारा : सातारा येथे आज विभागीय मराठा गोलमेज परिषद होत आहे. या परिषदेची तयारी पूर्ण झाली असून या परिषदेच अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परिषदेला आमदार शिवेंद्रराजे उपस्थित आहेत.  
या परिषदेमधून आजपर्यंत खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसून त्यांनी आपली भूमिका पहिल्यांदा जाहीर करावी, ही एक महत्वाची मागणी असल्याची माहिती सुरेश दादा पाटील यांनी दिली आहे. या परिषदेला मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा या समित्यांचे पाच जिल्ह्यांमधील पदाधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेकडे सर्व मराठा बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख