‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत..पडळकरांचा मुश्रीफांना टोला.

"सगळं गावचकरील तर सरकार कायकरील?"
‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत..पडळकरांचा मुश्रीफांना टोला.
Sarkarnama Banner - 2021-06-03T153712.732.jpg

सांगली : कोरोनाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं "कोरोनामुक्त गाव स्पर्धे"चे आयोजन केलं आहे. या स्पर्धेवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे.कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे, अशा परिस्थितीत ठाकरे सरकारनं जनतेची थट्टा केली आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे. सांगलीमधील झरे येथे ते बोलत होते.  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पडळकरांनी निशाणा साधला आहे. Gopichand Padalkar criticizes Thackeray government

पडळकर म्हणाले की, आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची  झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाउनमुळे पुर्णपणे मोडला आहे.. घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. त्यांचे अश्रु पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुख्खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचत आहे. "सगळं गावच करील तर सरकार काय  करील?"  हाच प्रश्न मला या कामचुकार  मंत्र्यांबद्दल पडला आहे. 

"नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा घेतली आहे," असे वक्तव्य पडळकर यांनी केले. ते म्हणाले की, या योजनेच्या व्यवस्थापनेचा सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत. तरीही सरकारने हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापनेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे. खरंतर या पन्नास लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे.  कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो, सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही.. पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही,  ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या ’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असे पडळकर म्हणाले. 

रामदेव बाबांना उच्च न्यायालयाने फटकारले..चुकीच्या विधानाबाबत नोटीस.. नवी दिल्ली :  अँलोपॅथीवरुन सुरू असलेला वाद आता दिल्ली उच्च न्यायालायात गेला आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने (DMA)याचिका दाखल केली आहे. पंतजलीच्या कोरोनील बाबत रामदेव बाबांनी केलेल्या चुकीच्या दावा आणि अँलोपॅथीबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्चन्यायालयाने रामदेव बाबांना नोटीस बजावली आहे. याबाबत उत्तर मागितलं आहे. "कोरोनीलचा प्रचार करा पण अँलोपॅथीबाबत चुकीचे विधान करु नका," असे न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावले. कोरोनावर उपाय करण्यासाठी कोरोनील योग्य की अयोग्य हे वैद्यकीय तज्ज्ञ ठरवितील, 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in