चार महिने झाले खावटी नाही.. ही तर आदिवासींची थट्टाच.. मुनगंटीवारांचा आरोप

'आदिवासींना खावटी देऊ', असं राज्य सरकारनं सांगितलं होतं,मात्र चार महिने झाले तरी खावटी दिली नाही,ही आदिवासी जनतेची थट्टा आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
चार महिने झाले खावटी नाही.. ही तर आदिवासींची थट्टाच.. मुनगंटीवारांचा आरोप
Sudhir Mungantiwar - Copy.jpg

मुंबई :  राज्यात 2018 च्या जनगणनेनुसार 10 टक्के जनता आदिवासींची आहे, एक कोटी दोन लाख आदिवासींची संख्या आहे, 'आदिवासींना खावटी देऊ', असं राज्य सरकारनं सांगितलं होतं, मात्र चार महिने झाले तरी खावटी दिली नाही, ही आदिवासी जनतेची थट्टा आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.  

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "खावटीसाठी भरावा लागणार अर्ज म्हणजे खावटी एक दिवा स्वप्न वाटते आहे. त्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारच्या विरोधात  420 चा गुन्हा दाखल करणार आहोत. चार महिने झाले जर पोलीस गुन्हा दाखल करणार नसतील तर न्यायालयात जाऊ."

"आदिवासीची लढाई आम्ही भाजपकडून लढू. मी खासदारांना विंनती केली आदिवासी की ज्या गोष्टींचा तुम्ही घोषणा करतात. घोषणाचं श्रेय घेतात, पण निर्णय घेतला नाही. जाहीरनाम्यातील अनेक तरतदूी आहेत, त्या पूर्ण केल्या जात नाही. कागदपत्रांसाठी नियम चुकीचे आहेत," असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा :शिक्षणमंत्री गायकवाड यांचा महत्वपूर्ण निर्णय.. 
मुंबई : लॅाकडाउननंतर मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकार टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. धार्मिक स्थळे, मंदिरे, प्रार्थना स्थळे यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी आँनलाईन संवादात सांगितले होते.  

शाळांना दिवाळीच्या सुट्या 20 नोव्हेंबर आहेत. त्यानंतर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट केलं आहे. राज्य सरकारकडून मुंबई व उपनगरातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 

"राज्य सरकारच्या वतीनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे
प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे," असे टि्वट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in