गिरीश महाजनांनी "चंपा' फेमस केलं....

"चंपा' नावाचे बारसे स्वत: गिरीश महाजन यांनीच केले आहे, महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना "अरे त्या 'चंपा'ला फोन लाव ! असे त्यांनी सांगितले.
2girish_mahajan_chandrakantdada
2girish_mahajan_chandrakantdada

जळगाव : चंद्रकांत पाटील यांच्या "चंपा'' नावाचे बारसे गिरीश महाजन यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना "टरबुज्या' भाजपमधीलच त्यांच्या विरोधी गटाचे लोक म्हणायचे. तेच नामकरण सर्वश्रृत झाले आहे. त्याला विरोधी पक्ष काय करणार ? असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.

भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे भाजपवर जोरदार हल्ला चढविला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते कि, विरोधी पक्षातील लोक मला "चंपा', फडणवीसांना "टरबुज्या' म्हणतात. त्यावर विरोधी नेते का बोलत नाही? यावर उत्तर देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कि चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हणल्याचे तीव्र दु:ख होत आहे. मात्र त्यांना हे माहित नसावे, कि त्यांचे "चंपा' नावाचे बारसे स्वत: गिरीश महाजन यांनीच केले आहे, महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना "अरे त्या 'चंपा'ला फोन लाव ! असे त्यांनी सांगितले. 


भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही, आपआपसातील व्देश आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती कि, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करून गुपचुप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना "टरबुज्या'म्हणायचे! आता तर तेच नामकरण सर्वश्रृत झाले. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय ? तसेही भाजपमध्ये स्वत:चे नाव आणि आडनाव एकत्र करून उल्लेख करण्याची पध्दत आहेच. नरेंद्र मोदीना "नमो' म्हणतात. अमित शहाना "मोटाभाई' म्हणतात. चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हणत असावेत असे माझे भोळे भाबडे विचार आहेत.
 
मराठा समाजाविरूध्द भडकविण्याचे उद्योग

भाजपमधील काही कार्यकर्ते आमच्या धनगर समाजातील काही तरूणांना हाताशी धरून मराठा समाजाविरूध्द भडकविण्याचे उद्योग करीत आहेत, असे मत व्यक्त करून गोटे यांनी म्हटले आहे, कि आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. गेल्या चार दिवसात पडळकरांचे स्पष्टीकरण आलेले नाही. उलट पडळकरांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरले आहेत हे कशाचे लक्षण मानायचे ? फटाक्‍याचा माळा लावून त्यांचे स्वागत करीत आरत्याही ओवळीत आहेत. कोरोनामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला. पडलेल्या भावाचा गैरफायदा घेवून भाजपचे कार्यकर्ते पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक करीत आहेत. आमच्या धनगर समाजातील काही तरूणांना हाताशी धरून शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला समस्त मराठा समाजाविरूध्द भडकविण्याचे उद्योग बेमालुमपणे सुरू आहे.

राम कदमांनी माझ्या नादी लागू नये

"अनिल गोटेचे वय झाले' असे प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी म्हटले आहे. त्यावर गोटे यांनी म्हटले आहे, कि माझ्या वयाची नेमकी अडचण त्यांना काय निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका काय संबध आले कुठे ? नाथाभाऊंच्या प्रकृतीबद्दलही पक्षातील विरोधकांकडून अशीच वक्तवे केली जात होती. संतापून भाऊंनी उत्तर दिले, ज्यांना करायची असेल माझ्या प्रकृतीची खात्री, त्यांनी घरी बोलवावे मला मध्यरात्री ! प्रवक्ते राम कदम यांना आपण एवढेच सांगतो, समुद्र किनारी जावून तोकड्या चडड्यामध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनांच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का ? माझ्या बद्दल वैयक्तीक बोलाल तेवढेच मी तुम्हाला समजणाऱ्या भाषेत उत्तर देईन ! माझ्या नादी लागू नका.


 
"महारोगाची' उपमा शांतपणे दिली

फडणवीसांना मी महारोगाची उपमा दिल्याबाबत ते म्हणाले, संतापाच्या भरात वैगेरे काही बोललो नाही.उलटपक्षी माझ्या मनात उसळेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये महणून संयमी वक्तव्य केले.प्रसिध्दी माध्यमाशी बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत आणि डोक्‍यावर नियंत्रण ठेवून फडणवीसांना महारोगाची उपमा दिली आहे. "महारोगी'असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे असेही गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com