गौतम गंभीर अडचणीत; उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश - Gautam Gambhir Foundation has committed an offence under Drugs and Cosmetics Act | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

गौतम गंभीर अडचणीत; उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

गौतम गंभीर यांच्या फाऊंडेशनमार्फत कोरोना काळामध्ये नागरिकांना फॅबिफ्लू व इतर औषधांचे वाटप करण्यात आले होते.

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी बेकायदेशीरपणे कोरोनावरील औषधे ऑक्सीजन सिलिंडरचा साठा केला होता. भाजपसह अन्य काही पक्षाच्या नेत्यांनी फॅबिफ्लू, (Fabiflu) रेमडेसिविरसह (Remdesivir) काही औषधांचा साठा करत त्याचे नागरिकांना मोफत वितरणही केले. याचप्रकरणात भाजपचे खासदार गौतम गंभीर अडचणीत आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Gautam Gambhir Foundation has committed an offence under Drugs and Cosmetics Act)

गौतम गंभीर यांच्या फाऊंडेशनमार्फत कोरोना काळामध्ये नागरिकांना फॅबिफ्लू व इतर औषधांचे वाटप करण्यात आले होते. त्यांच्यासह काही जणांनी या औषधांचा अनधिकृतपणे साठा केल्याच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. यामध्ये आप आमदारांचेही नाव आहे. या याचिकेवर न्यायालयाने काही दिवसांपूर्वी औषध महानियंत्रकांना चौकशीचे आदेश दिले होते. नुकताच चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. 

हेही वाचा : 'सिरम'चं मोठं पाऊल; कोविशिल्डसह स्पुटनिक व्ही लशीचेही उत्पादन करणार

न्यायालयाने हा अहवाल फेटाळून लावत औषध महानियंत्रकांवर (DCGI) ताशेरे ओढत पुन्हा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हे तुम्ही करणार नसाल तर काय करायचे हे आम्हाला चांगले माहिती आहे. तुम्ही केलेली चौकशी संशयास्पद आहे. किती प्रमाणात औषधांचा साधा होता हे पाहण्यात आले नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. 

गुरूवारी या प्रकणावर झालेल्या सुनावणीदरम्यान औषध महानियंत्रकांच्यावतीने बाजू मांडण्यात आली. बेकायदेशीरपणे औषधांचा साधा करणे आणि कोरोनाबाधित रुग्णांना फॅबिफ्लू औषधाचे वितरण करण्यात गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी आढळून आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने गौतम गंभीर फाऊंडेशनसह इतरांवर कोणत्याही विलंबाशिवाय कारवाई करण्याचे आदेश औषध महानियंत्रकांना दिले. तसेच वितरक आणि यासंदर्भात अन्य प्रकरणांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. 

गुजरातमध्येही भाजप कार्यालयातून रेमडेसिविर या औषधांचे वाटप केले जात होते. त्याकाळात या औषधाचा देशभरात मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतरही भाजप कार्यालयात मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा होता. तसेच नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही रेमडेसिविर इंजेक्शन खासगी विमानाने आणली होती. त्यावरही मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख