सेवाग्राम येथे "गांधीवाद्यांचा शांती मार्च"मधून विविध संदेश... - Gandhi Peace March" at Sevagram  | Politics Marathi News - Sarkarnama

सेवाग्राम येथे "गांधीवाद्यांचा शांती मार्च"मधून विविध संदेश...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

गांधींचे विचार, आदर्श, सिद्धांत या सर्वांचे दर्शन या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आले.  

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सुनील केदार यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गांधीवाद्यांचा शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चचा प्रारंभ पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आला. गांधी चैाक ते सेवाग्राम आश्रमापर्यंत या गांधीवाद्यांचा शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

गांधी चौक येथील पुतळ्याला सुनिल केदार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौक ते सेवाग्राम आश्रमापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधींचे विचार संपूर्ण देशात पोहचविण्यासाठी या शांती मार्चचे आयोजन करण्यात होते. पदयात्रेत गांधीवाद्यांकडून विविध संदेश देण्यात आले. गांधींचे विचार, आदर्श, सिद्धांत या सर्वांचे दर्शन या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आले.  

गांधींचे प्रांजळपण अंगिकारलं तर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

पुणे : ''बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला' हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. राज यांनी आपल्या फेसबूक पेजवरुन ही पोस्ट केली आहे, ''आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय,'' असंही राज यांनी म्हटलं आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख