पवारांना मानणारे गडाख अखेर शिवसेनेत 

राज्याचे मृद्‌ व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (ता. 11 ऑगस्ट) अपक्ष ही ओळख संपवत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. नेवासे परिसरात कायम कॉंग्रेस विचारसरणीचे पाईक असलेले विशेषतः शरद पवार यांची कायम सोबत केलेल्या गडाख घराण्याने आता शिवसेनेसोबत नाते जोडले आहे.
Gadakh who considers Sharad Pawar finally goes in Shiv Sena
Gadakh who considers Sharad Pawar finally goes in Shiv Sena

मुंबई : राज्याचे मृद्‌ व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (ता. 11 ऑगस्ट) अपक्ष ही ओळख संपवत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. नेवासे परिसरात कायम कॉंग्रेस विचारसरणीचे पाईक असलेले विशेषतः शरद पवार यांची कायम सोबत केलेल्या गडाख घराण्याने आता शिवसेनेसोबत नाते जोडले आहे. 

नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या मृत्यूमुळे नगर जिल्हा शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष विजय औटी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नीलेश लंके यांनी पराभव केला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात शिवसेना पोरकी झाली होती. 

राज्यात शिवसेनेची सत्ता असताना नगर जिल्ह्यातून मात्र शिवसेनाचा प्रतिनिधी मंत्रिमंडळात नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कामाला वेग मिळत नव्हता. त्यातच राठोड यांचे नुकतेच निधन झाल्याने कार्यकर्त्यांना हक्काचा नेता नव्हता. ती सर्व पार्श्‍वभूमी पाहून शिवसेना नेत्यांनी शंकरराव गडाख यांना शिवसेनेत आणले. हा शिवसेनेचा निर्णय नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्री निवासस्थानी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 

दरम्यान, राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाची महाविकास आघाडीचे सत्तेचे गणित जुळल्यानंतर नेवसातून अपक्ष निवडणूक जिंकलेले शंकरराव गडाख यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. तो पठिंबा त्यांनी शिवसेनेला जाहीर केला होता, त्याचे फळ त्यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी मिळाले. 

राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदी संधी दिली होती. ठाकरे यांच्या या निर्णयाने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, गडाख घराणे तसे कॉंग्रेस विचाराचे पाईक आहे. शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी कॉंग्रेसच्या विचाराची बांधिलकी मानून राजकारण केले. राज्याच्या राजकारणात त्यांनी शरद पवार यांची कायम पाठराखण केलेली आहे. 

'महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे घेतला होता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर कायम संपर्कात असल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आलो अन आकर्षित झालो होतो,' असे शंकरराव गडाख यांनी सांगितले. 

गडाख म्हणाले की शिवसेना हा पक्ष कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणारा पक्ष आहे. शिवसेनेच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेला विश्‍वास आणि निष्ठेमुळे शिवसेनेत प्रवेश केला. या पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहणार आहे.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com