शिवसेनेकडून बैलगाडी रस्त्यावर..तर भाजपचा हल्लाबोल.. 

जर, आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का नाही अशीविचारणा यावेळी भाजपने केली.
shiv6.jpg
shiv6.jpg

पिंपरी  : कोरोना काळातील वाढीव वीजबिल वसुलीसाठी सक्तीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपने काल  (ता. ५) महावितरणच्या शहर कार्यालयाला  टाळे ठोकण्यात आले.  राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केले. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने घरगुती गॅस आणि बैलगाडी रस्त्यावर आणून प्रतिआंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला. त्यामुळे एकेकाळच्या दोस्तातील ही कुस्ती चर्चेचा विषय झाली.

पूर्वीच्या मित्रपक्षांनीच एकमेकांच्या सरकारविरोधात काल राज्यभर दंड ठोकले. केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने, तर कोरोना काळातील राज्याच्या वाढीव वीजबिलाविरुद्ध केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने शहरात काल आंदोलन केले. वीजबिल माफीचे आश्वासन न पाळता उलट वीजबिल भरण्यासाठी तगादा लावल्याने भाजपने केलेल्या आंदोलनात त्यांचे शहरातील प्रदेश पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

वीजमाफी माफी सोडा, उलट वीजबिलाच्या वसुलीसाठी ती खंडीत करण्याची धमकी देणाऱ्या या सरकारची मनमानी चालू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य जनतेला वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली, तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. भाजपचे राज्य असताना वीज कंपन्या फायद्यात होत्या. जर, आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का नाही अशी विचारणा यावेळी भाजपने  केली.

राज्याविरुद्ध केंद्रातील सत्तेत असलेल्या भाजपने केलेल्या आंदोलनाला उत्तर म्हणून केंद्राने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध शहर शिवसेनेने लगेचच रस्त्यावर गॅसटाकी आणून तसेच बैलगाडी चालवून केला. शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने स्पाईन रोड स्पाईन चौक येथे बैलगाडी तसेच गॅस सिलेंडर रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके,विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, भोसरी युवा अधिकारी कुणाल जगनाडे तसेचआशा भालेकर रूपाली अल्हाट,सुनंदा कदम आदी त्यात सामील झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com